Maharashtra Cabinet Reshuffle
Maharashtra Cabinet ReshuffleSaam Tv News

धनंजय मुंडे नव्हे 'या' नेत्याची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री? एकनाथ शिंदेंनी घेतली भेट; कुणाचा पत्ता कट होणार?

Maharashtra Cabinet Reshuffle: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता वर्तवली जात आहे. तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published on

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळातील खांदेपालटाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि सभागृहात रमी खेळल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांचेही मंत्रिपद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, माणिकराव यांना मंत्रिपदावरून दूर केल्यास धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात आणलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे. अशातच शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंनी घेतली तानाजी सावंतांची भेट

मंत्रिमंडळातील काही नेत्यांचे मंत्रिपद धोक्यात असताना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची वाईल्ड कार्ड होणार असल्याचं बोललं जात आहे. याला कारण म्हणजे तानाजी सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली भेट. गेल्या नऊ महिन्यांपासून तानाजी सावंत नाराज आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंची तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

Maharashtra Cabinet Reshuffle
ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज येथे तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी गेले होते. सावंत यांच्यावर अलीकडेच एंजिओप्लास्टी झाली असून, त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी शिंदे स्वतः त्यांच्या घरी गेले होते. मात्र, या भेटीमागे केवळ तब्येतीची चौकशी की काही मोठा राजकीय डाव? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी घेतलेली भेट तानाजी सावंत यांच्या नाराजीवर फुंकर ठरेल का? तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घ्यायचं झाल्यास कोणत्या विद्यमान मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार? याचीही चर्चा सध्या सुरूये.

Maharashtra Cabinet Reshuffle
एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचा आरोप, निखिलसोबत त्यावेळी काय झालं होतं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com