Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला राम मंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधायचीय; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

Himanta Biswa Sarma on Babri Masjid: काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर अयोध्येतील राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद बांधली जाऊ शकते, असं खळबळजनक विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे.
Himanta Biswa Sarma on Babri Masjid
Himanta Biswa Sarma on Babri MasjidSaam TV

काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर अयोध्येतील राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद बांधली जाऊ शकते, असं खळबळजनक विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे. बाबरी मस्जिदीची पुनर्बांधणी थांबवण्यासाठी भाजपच्या ४०० हून अधिक जागा जिंकून द्या, असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं आहे.

Himanta Biswa Sarma on Babri Masjid
Kantilal Bhuria: दोन बायका असलेल्या पुरुषांना मिळणार २ लाख रुपये; काँग्रेस नेत्याची अजब ऑफर

ओडिसाच्या मलकानगिरी येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना हिमंता बिस्वा सरमा यांनी हे विधान केलंय. त्यांच्या या विधानाने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता राजकीय पक्षांनी चौथ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे.

यावेळीही राम मंदिर हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा राहिला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. ओडिसा येथील रॅलीला संबोधित करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "लोक आम्हाला विचारतात की आम्हाला ४०० जागा का हव्या आहेत?"

"कारण काँग्रेस राम मंदिराऐवजी बाबरी मशीदीची पुनर्बांधणी करू शकते. मात्र, बाबरी मशीद भारतात पुन्हा कधीही बांधली जाणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी एनडीएला ४०० हून अधिक जागांवर विजयी करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे".

"पूर्वी काँग्रेसचे लोक आम्हाला विचारायचे की राम मंदिर कधी बांधणार? त्याची तारीख सांगा. आता काँग्रेसवाले हे प्रश्न विचारत नाहीत. कारण आम्ही राम मंदिरही बांधले आहे. मोदींनी दिलेल्या हमीचा हा परिणाम आहे. आता लाखो लोक राम मंदिराला भेट देत आहेत".

"आमचे सरकार एखादी गोष्ट फक्त बोलून दाखवत नाही, तर ती पूर्णही करते. काँग्रेसला हे कळून चुकले आहे. केवळ राम मंदिरापर्यंत आम्ही थांबणार नाही. देशातील प्रत्येक मंदिर मुक्त करायचे आहे. आमचा अजेंडा मोठा आहे आणि आम्हाला पुढे जायचे आहे", असंही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

Himanta Biswa Sarma on Babri Masjid
Breaking News: इराणच्या ताब्यातून ५ भारतीय खलाशांची सुटका; भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com