हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी उसळली, मनालीत 13 दिवसांत 3 लाख पर्यटक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Heavy Traffic Jam On Chandigarh Manali Highway During Weekend: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पर्यटकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मनाली, शिमला आणि धर्मशालामध्ये विक्रमी गर्दी झाली असून वाहतूक कोंडीमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
Heavy traffic congestion on the Chandigarh-Manali highway as thousands of tourists head to hill stations during the long weekend.
Heavy traffic congestion on the Chandigarh-Manali highway as thousands of tourists head to hill stations during the long weekend.saam tv
Published On

उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लांब विकेंड आणि आल्हाददायक हवामानामुळे सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कुल्लू-मनालीपासून धर्मशाला, शिमला, डलहौजी आणि बद्रीनाथ धामपर्यंत पर्यटक आणि भविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एका बाजूला पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळत असताना, दुसऱ्या बाजूला वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

Heavy traffic congestion on the Chandigarh-Manali highway as thousands of tourists head to hill stations during the long weekend.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा गैरफायदा; तोतया महिला अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याला अटक

कुल्लू मनालीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी

हिमाचल प्रदेशामध्ये सध्या पर्यटकांचा कल वाढत चालला आहे. वीकेंड असल्याने कुल्लू मनालीकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांमुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. चारही बाजूनी बर्फाची चादर अन् रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तसेच धर्मशालामध्ये देखील दीर्घसुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालीय. सगळीकडेच अजुनही उकाडा असल्याने शरीराला आणि मनाला थंडावा मिळवा यासाठी अनेकांनी याठिकाणी धाव घेतली.

Heavy traffic congestion on the Chandigarh-Manali highway as thousands of tourists head to hill stations during the long weekend.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा गैरफायदा; तोतया महिला अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याला अटक

धर्मशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय सामन्यामुळेही पर्यटकांची संख्या वाढली आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या मते, या सामन्यामुळे पुढील काही दिवसांत गर्दीत आणखी वाढ होऊ शकते. अनेक हॉटेल्समध्ये 100 टक्के बुकिंग झाले असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि टॅक्सी व्यवसायाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

Heavy traffic congestion on the Chandigarh-Manali highway as thousands of tourists head to hill stations during the long weekend.
Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

मनालीत विक्रमी पर्यटकांची गर्दी

मनालीमध्ये सध्या पर्यटकांचा प्रचंड ओघ पाहायला मिळत आहे. गेल्या 13 दिवसांत सुमारे 3 लाख पर्यटक कुल्लू-मनालीमध्ये दाखल झाले आहेत. अटल टनेल रोहतांग, रोहतांग पास, शिंकुला आणि बारालाचा यांसारख्या ठिकाणी मोठी गर्दी आहे. गेल्या पाच दिवसांत अटल टनेलमधून 50 हजारांहून अधिक वाहने गेली, तर मनालीत जवळपास 15 हजार बाहेरील वाहनांची नोंद झाली आहे. पर्यटन व्यवसायिकांच्या मते, यंदाचा हंगाम मागील वर्षाच्या तुलनेत अधिक चांगला आहे. हॉटेल, होमस्टे आणि एअरबीएनबीमध्ये सुमारे 90 टक्क्यांपर्यंत बुकिंग झाले आहे. मात्र वाढत्या गर्दीसोबत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरली आहे. काही ठिकाणी एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठीही एक तास लागत आहे. याचा परिणाम पर्यटकांसह स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्गावर होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com