Election Commission : हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे.
Election Commission of India
Election Commission of IndiaSaam Tv
Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. हिमाचलमध्ये 17 ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयोगाने सांगितले. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहेत. 27 तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्रांची छाननी करावी लागणार आहे. 29 ऑक्टोबरला नावे मागे घेता येतील. 12 नोव्हेंबर रोजी मतदान, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Election Commission of India
Andheri By-election: ठाकरे गटाकडून ऋतुजा लटकेंसह संदीप नाईक यांचाही उमेदवारी अर्ज दाखल, काय आहे कारण?

निवडणूक आयोगाकडून हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या 68 जागांसाठी निवडणूक होणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची मुदत 8 जानेवारी 2023 ला संपत आहे. त्या अगोदर निवडणूका होणार आहेत. 68 जागांपैकी एससीसाठी 17 जागा आणि एसटीसाठी 3 जागा राखीव आहेत. याठिकाणी 55 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. (Latest Marathi News)

Election Commission of India
Shivsena : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजय कुणाचा? शिवसैनिक म्हणतात, ही तर काळ्या दगडावरची रेघ!

हिमाचल प्रदेश विधानसभेतील सध्याची पक्षीय बलाबल

>> भाजप- 44

>> काँग्रेस- 21

>> सीपीआय (एम)- 01

>> इतर - 02

हिमाचलमधील 2017 विधानसभेचा निकाल पाहिला तर भाजप आणि काँग्रेस येथे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. मात्र आम आदमी पार्टीने दिल्ली, पंजाबनंतर हिमाचलमध्ये लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे आप देखील याठिकाणी दोन्ही मोठ्या पक्षांना कडवी झुंज देऊ शकतो. त्यामुळे येथील निवडणुकीत मोठी चूरस पाहायला मिळेल, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.