Shivsena : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजय कुणाचा? शिवसैनिक म्हणतात, ही तर काळ्या दगडावरची रेघ!

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपकडून आज शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.
Andheri East By-Election, Rutuja Latake Muruji Patel
Andheri East By-Election, Rutuja Latake Muruji Patel
Published On: 

Andheri East By-Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपकडून आज शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत. (Mumbai News Today)

Andheri East By-Election, Rutuja Latake Muruji Patel
Shivsena vs BJP : ठाकरे गटाचा नेता आणि माजी आमदार भाजपच्या गळाला

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपलाच उमेदवार विजयी होईल, असं दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येतंय. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणुक असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह भरलेला आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय होईल असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. ही विजयाची नांदी आहे, सुरूवात आहे, निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल, असं शिवसैनिकांकडून सांगण्यात येतंय. (Latest Marathi News)

Andheri East By-Election, Rutuja Latake Muruji Patel
Pune MNS : पुणे मनसेत फूट? पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा

'१९८५ मध्ये जशी मशाल हाती घेऊन निवडणुकीत विजय मिळवला तसाच विजय या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय होईल, ऋतुजा लटके या १०० टक्के भरघोस मतांनी निवडून येईल, ही काळ्या दगड्यावरची भगवी रेष आहे', असंही शिवसैनिकांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)

दुसरीकडे, मुरजी पटेल यांच्यासोबत भाजचे दिग्गज नेते तसेच कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहे. भाजपकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. भाजप आमदार नितेश राणे हे सुद्धा मुरजी पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत. निवडणूकीत भाजपचाच विजय होईल, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.