

Avadhoot Tatkare join BJP : राज्यात एकीकडे अंधेरी पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे भारतीय जनता पार्टी शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे यांच्या गटाला (Uddhav Thackeray) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे यांना भाजपने आपल्या गळाला लावलं आहे. (Shivsena News Today)
तटकरे हे आज (शुक्रवारी) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित तटकरे आपल्या समर्थकांसोबत भाजप प्रवेश करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
कोण आहेत अवधूत तटकरे?
माजी आमदार अवधूत तटकरे, हे तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ आहेत. रोह्याचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे.
एकेकाळी अवधूत तटकरे यांच्याकडे सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. त्यांची आक्रमकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा ही सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीची ठरली आहे.
दरम्यान, सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर, आपल्याच आमदारकी मिळाली पाहिजे असा दावा करत अवधूत यांनी काकांनाच आव्हानं दिलं होतं. तेव्हापासूनच तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.