

अमरोहामध्ये बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजमध्ये पकडलं
बायकोकडून नवऱ्याला चप्पलने मारहाण
हाय वोल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशच्या अमरोहामधून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बायको नवऱ्याची चपलेने धुलाई करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. या ठिकाणी एका महिलेने आपल्या नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले. या महिलेने हॉटेलवर जाऊन हाय वोल्टेज ड्रामा केला. तिने आधी नवऱ्याच्या थोबाडीत मारल्या. त्यानंतर चपलेने धू धू धुतलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या नवऱ्याचे गेल्या अनेक दिवसांपासून एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ते एकमेकांना नेहमी भेटायचे देखील. दोघेही हॉटेलवर भेटायचे. महिलेला नवऱ्याच्या अनैतिक संबंधाविषयी कळाले तर तिचा राग अनावर झाला. महिलेचा नवरा नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता घराबाहेर पडला. त्याची गर्लफ्रेंड देखील घरातून बाहेर पडली. गावाबाहेर भेटत दोघंही दुचाकीवरून एका हॉटेलवर गेले. नवरा गर्लफ्रेंडसोबत ज्या हॉटेलवर गेला त्याठिकाणी महिला त्यांचा पाठलाग करत गेली.
महिलेने हॉटेलमधील एका खोलीत दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. हॉटेलमधील खोलीचा दरवाजा उघडताच महिलेला धक्का बसला. तिचा नवरा गर्लफ्रेंडसोबत बेडवर दिसला. महिलेने नवऱ्याला बाहेर बोलावलं पण तो दरवाजा उघडत नव्हता. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या हाय वोल्टेज ड्रामाचा व्हिडीओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
महिलेने खोलीमध्ये घुसून आधी नवऱ्याला हाताने मारहाण केली. त्यानंतर तिने चप्पल काढत नवऱ्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सध्या या घटनेची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.