Shocking: भाजप नेत्याची हत्या करणाऱ्यांचा एन्काऊंटर, आरोपीच्या वडिलांची आत्महत्या, तर आईनं विष प्यायलं...

BJP Leader Killed Case: मध्य प्रदेशमध्ये भाजप नेत्याची हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या गोळ्या झाडत भाजप नेत्याला संपवण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये आरोपी जखमी झालेत.
Shocking: भाजप नेत्याची हत्या करणाऱ्यांचा एन्काऊंटर, आरोपीच्या वडिलांची आत्महत्या, तर आईनं विष प्यायलं...
BJP Leader Killed CaseSaam Tv
Published On

Summary -

  • भाजप नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

  • आरोपींना अटक करताना पोलिसांवर गोळीबार

  • पोलिसांनी संरक्षणार्थ गोळीबार केला. आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी

  • आरोपींच्या वडिलांनी आत्महत्या केली तर आईने विष प्राशन केलं

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून मध्यरात्री एन्काऊंटर करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी संरक्षणार्थ गोळीबार करत आरोपींना प्रत्युत्तर देत. यावेळी पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला. पोलिसांनी चार राऊंड फायरिंग केले यामध्ये आरोपींच्या पायाला गोळी लागली. जखमी झालेल्या दोन्ही आरोपींना उपचारासाठी जबलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यामध्ये बजरंग दलाचा युवा नेता आणि भाजप मागासवर्गीय आघाडी मंडळाचे अध्यक्ष निलेश उर्फ नीलू रजक यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. छातीला गोळी लागल्यामुळे भाजप नेत्याचा जागीच मृत्यू झाला. अक्रम खान आणि प्रिन्स जोसेफ या आरोपींनी त्यांची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते.

Shocking: भाजप नेत्याची हत्या करणाऱ्यांचा एन्काऊंटर, आरोपीच्या वडिलांची आत्महत्या, तर आईनं विष प्यायलं...
Crime News : चक्रीने घात केला! ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन तरुणाची आत्महत्या, काय आहे प्रकार?

मध्यरात्री पोलिस आरोपींना अटक करण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला आणि चकमक झाली. पोलिसांनी परिसराला घेराव घातला आणि आरोपींनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. यावेळी आरोपींच्या पायाला गोळी लागली आणि ते जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कैमोर पोलिस ठाण्यापासून ७०० मीटर अंतरावर असलेल्या बँक ऑफ बडोदासमोर भाजप नेत्याची हत्या करण्यात आली. नीलू रजक यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन दोघांनी त्यांच्या छातीत जवळून गोळी झाडली आणि ते पळून गेले. नीलू रजक यांना तातडीने विजयराघवगड रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Shocking: भाजप नेत्याची हत्या करणाऱ्यांचा एन्काऊंटर, आरोपीच्या वडिलांची आत्महत्या, तर आईनं विष प्यायलं...
Crime : नागपूर हादरले! २३ वर्षीय 'रील स्टार' रिंकीची हत्या, मेकॅनिक नवऱ्याने डोकं फोडलं

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. स्थानिकांनी बाजारपेठ बंद ठेवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला. भाजप नेत्याच्या हत्येनंतर धक्का बसलेल्या आरोपी प्रिन्स जोसेफच्या वडिलांनी आत्महत्या केली. तर त्याच्या आईने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हत्या करण्यात आलेला भाजप नेता १८ वर्षांपासून पक्षासाठी काम करत होता. २०२३-२४ मध्ये नीलू रजक मागासवर्गीय आघाडीचे मंडल अध्यक्ष झाले. ते आमदार आणि राज्यमंत्री संजय पाठक यांचे निकटवर्तीय होते.

Shocking: भाजप नेत्याची हत्या करणाऱ्यांचा एन्काऊंटर, आरोपीच्या वडिलांची आत्महत्या, तर आईनं विष प्यायलं...
Crime News: गोरक्षकांकडून मारहाण; सोशल मीडियावरील बदनामीमुळं तरुणानं संपवलं जीवन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com