Amruta Malwadkar : लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; नवऱ्याचे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शी आहे खास कनेक्शन, पाहा PHOTOS

Amruta Malwadkar Wedding : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Amruta Malwadkar Wedding
Amruta MalwadkarSAAM TV
Published On
Summary

मराठी अभिनेत्री अमृता माळवदकर लग्नबंधनात अडकली.

अमृताचा नवरा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचा लेखक आहे

अमृताला 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.

काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. सर्वत्र दिवाळीची लगबग पाहायला मिळत आहे. मनोरंजन क्षेत्रातही मालिकांमध्ये दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' फेम अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकप्रिय अभिनेत्री अमृता माळवदकरचा (Amruta Malwadkar ) नुकताच थाटामाटात लग्न सोहळा पार पडला आहे. तिच्या लग्न सोहळ्याला कुटुंबिय आणि जवळचे मित्र पाहायला मिळाले. तिच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताचा नवरा देखील मनोरंजन सृष्टीतील आहे. अमृताने विनायक पुरुषोत्तमसोबत ( Vinayak Purushottam) लग्न केले आहे. विनायक 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा (Maharashtrachi Hasya Jatra) लेखक आहे.

अमृता आणि विनायक दोघांनीही आपापल्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. अमृता माळवदकरने आपल्या अभिनयाने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे विनायक पुरुषोत्तमला देखील खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने आजवर प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. या शोचे लाखो चाहते दिवाने आहेत.

Amruta Malwadkar
Amruta Malwadkarinstagram

दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. अमृताने सुंदर लाल रंगाची साडी नेसली होती. गोल्डन ज्वेलरी, नाकात नथ, हातात हिरवा चुडा असा साज श्रृंगार तिने केला होता. तर विनायकने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा घातला होता. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत होते. सध्या अमृता माळवदकर आणि विनायक पुरुषोत्तम दोघांवर प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिवाळी अमृताचा लग्नानंतर पहिलाच सण असणार आहे.

Amruta Malwadkar Wedding
'Bigg Boss 19' च्या घरातून मास्टर माइंडचा पत्ता कट, नाव वाचून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com