Manasvi Choudhary
आजकाल टॅटू काढणं फॅशन बनलं आहे. सर्वसामान्यापासून ते सेलिब्रिटी सर्वजण आवडीचा टॅटू काढतात. अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील हातावर टॅटू गोंदवला आहे.
पण तुम्हाला माहितीये का? अमृताने हातावर काढलेला टॅटू कोणत्या खास व्यक्तीविषयी आहे.
अमृताने हाताच्या मनगटावर टॅटू काढला आहे. स्वत:चे नाव आणि बहिणीचे नाव असा टॅटू तिने बनवला आहे.
अमृता खानविलकरच्या बहिणीचे नाव अदिती आहे जे तिने हातावर गोंदवलं आहे. अदिती ही अमृताची बहीण आहे.
अमृता खानविलकरच्या टॅटूमधून अमृता आणि अदिती यांच्यातील घट्ट नाते आणि प्रेम व्यक्त होते.
अमृताची बहिण अदितीचं लग्नानंतरचे नाव अदिती बक्षी असं आहे. ती सध्या दुबईत राहते.
ती एअर हॉस्टेस आहे. सोशल मीडियावर अदिती तिचे फोटो पोस्ट करते. अदितीला एक मुलगा देखील आहे.