Manasvi Choudhary
आजकाल काहीही दुखलं की लगेच गोळी घेऊन आराम करण्याची सवय अनेकांना झाली आहे.
अनेकांचा असा समज आहे, की कोणत्याही दुखण्यावर गोळी घेतली की बरं वाटते. मात्र सतत पेनकिलर खाल्ल्याने आरोग्यासाठी घातक आहे.
पेनकिलर खाल्ल्याने वेदना कमी होतात परंतु शरीराच्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो.यकृत,हृदय आणि मूत्रपिंड हे अवयवांवर गंभीर परिणाम होतो.
वेदना हे आजार नसून समस्येचे लक्षण आहे जे मेंदूला जाणवते आणि त्रास होतो मात्र यासाठी सतत पेनकिलर खाणे हा पर्याय नाही.
पेनकिलर खाल्ल्याने काही वेळेपुरते बरे वाटते मात्र आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो असे समोर आले आहे.
सतत पेनकिलर खाल्ल्याने तोंडाचा दुर्गंधी, अल्सर, जठराला सूज, आतड्याचे आजार उद्भवतात यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे.
जर एखाद्या व्यक्तीला सतत वेदना होत असतील तर तुम्ही काही महिने पेनकिलर खात असाल तर यामुळे तुमचे पोटात गॅस, अल्सर होई शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या