Shreya Maskar
शिवाली परबला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून खूप लोकप्रियता मिळाली. तिला मराठी इंडस्ट्रीत 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखले जाते.
शिवाली परबने नुकतेच वेस्टन लूकचे फोटो शेअर केले आहे. तिने ब्राउन रंगाचा स्कर्ट-टॉप परिधान केला आहे.
शिवाली वेस्टन लूकमध्ये खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
गोल्डन ज्वेलरी, केसांची पोनीटेल, व्हाइट चप्पल, मिनिमल मेकअपमध्ये शिवालीचे सौंदर्य खुलले आहे. तिच्या फोटोतील कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
तिचे हे हॉट फोटो पाहून एका चाहत्याने तर चक्क शिवालीला लग्नाची मागणी घातली आहे. चाहत्याने कमेंट केली की, "मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, लग्न करशील का? खरंच खूप आवडतेस..."
शिवाली परबने मालिका, नाटकं, वेब सीरिज तसेच चित्रपटांत काम केले आहे. तिच्या अभिनयाचे आणि कॉमेडीचे चाहते दिवाने आहेत.
शिवाली परबने 'मंगला' या मराठी चित्रपटात सुरखे अभिनय केला आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
शिवाली परब सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ देखील शेअर करत असते. अलिकडेच तिने 'मोहब्बत हो गई...' गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. तिचे डान्स व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतात.