Viral Video : कधीचं पाहिली नसेल अशी झूंज; कोंबडी थेट कावळ्याला भिडली, अन्...', व्हिडिओ तुफान व्हायरल

कोंबडी आणि कावळ्याचा झुंजीचा अजब व्हिडिओ समोर आला आहे.
Viral Video
Viral VideoSaam tv

नवी दिल्ली : सोशल मीडियावर साप-मुंगूस आणि कोंबडीच्या झुंजी अनेकदा पाहिल्या असतील. अनेकदा तुम्ही जंगलातील रानटी प्राण्याकडून जंगलातील कमकुवत प्राण्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ पाहिला असेल. तर पाळीव प्राणीसुद्धा एकमेकांशी खेळत असतात. त्यांचाही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला असेल. याचदरम्यान, कोंबडी आणि कावळ्याचा झुंजीचा अजब व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंट rajsinghmedia_123 नावाच्या अकाउंट धारकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कोंबडी आणि कावळ्याची झूंज दिसून आली आहे. जमीनीवर राहणाऱ्या आणि हवेत उडणाऱ्या या पक्षाची अनोखी झुंज पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत कोंबडीने कावळ्यावर हल्ला करत अर्धमेलं केलं आहे.

Viral Video
Viral Video : फायनान्सचे हप्ते थकले; कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरचं उचलून नेली बाईक; व्हिडिओ व्हायरल

कोंबडीचा कावळ्यावर जबर हल्ला

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसून येत आहे की, कोंबडी आणि कावळ्याची अनोखी झूंज पाहायला मिळत आहे. मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोंबडीने कावळ्याला जमिनीवर आपटून आपटून अर्धमेलं केलं. चोरी केल्यावर चोराची जशी धुलाई केली जाते, त्याप्रमाणे कोंबडी धुलाई करत आहे.

सोशल मीडियावरील कोंबडी आणि कावळ्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच पंसत पडला आहे . या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कोंबडीने कावळ्यावर एवढा हल्ला केला की, कावळा अर्धमेला झाला आहे. कोंबडी मुळातचं आक्रमक स्वभावाची असते. कोंबडीचा जबर हल्ला कावळ्याला चांगलाच भारी पडल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अवस्थेतही कावळा स्वत:च्या रक्षणासाठी धडपड करताना दिसत आहे.

कोंबडी आणि कावळ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com