हृदय पिळवटणारी घटना! मायेच्या मिठीत जुळ्यांचा शेवट, मलब्याखाली तिघांच्या मृत्यूने मन थरारलं

Uttarakhand Chamoli landslide mother twins death : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानंतर हृदय पिळवटणारी घटना घडली. मलब्याखाली आईच्या कुशीत जुळ्या मुलांचे मृतदेह मिळाले. आईने शेवटपर्यंत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिघांचाही दुर्दैवी अंत झाला.
Uttarakhand Chamoli landslide mother twins death
Heartbreaking Chamoli, Uttarakhand – Mother and twin children found dead under debris after landslide.
Published On
Summary
  • उत्तराखंडातील चमोली येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली.

  • आईच्या कुशीत जुळ्या मुलांचे मृतदेह मलब्यातून सापडले.

  • आईने मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिघांचाही मृत्यू झाला.

  • या हृदय पिळवटणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Heartbreaking Uttarakhand tragedy 2025 floods : नद्यांना पूर, दरडी कोसळल्या, लोकांचे संसार उघड्यावर पडले. जनावरेही वाहून गेली. जिकडे पाहावे तिकडे फक्त अन् फक्त पाणी, चिखल, पडलेली घरे अन् मलबाच. उत्तर भारतात सध्या ही भयान परिस्थिती आहे. बचाव पथक दिवसरात्र मदतीसाठी उत्तराखंडमध्ये तळ ठोकून आहेत. गाव-शहरातील मलबा काढताना काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना समोर येत आहेत. उशीच एक घटना उत्तराखंडमधील चमोलीत समोर आली. मलब्याखाली आई आणि जुळ्या मुलांचे मृतदेह मिळाले. ते दृश्य पाहून उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे मन थरारले. कारण, मलब्याखाली आईच्या कुशीत दोन्ही जुळी मुलं होती. आईने शेवटच्या श्वासापर्यंत मुलांना वाचवण्याची धडपड केली. जिवाची बाजी लावली पण माऊलीला आपल्या काळजाचा तुकडा काही वाचवता आला नाही. आई आणि दोन जुळ्या मुलांचे मृतदेह पाहून बचाव पथक आणि स्थानिक स्तब्ध झाले. ही हृदय पिळवटणारी घटना पाहून चकार शब्दही निघाला नाही.

हृदय पिळवटणारी घटना

उत्तराखंडमधील चमोली येथील नंदानगरमध्ये ही हृदय पिळवटणारी घटना समोर आली. पावसाने क्षणात होतं नव्हते ते हिरावून नेलं. त्यात आई आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह मलब्याखाली बचावपथकाला आढळले. या दुर्देवी घटनेचे फोटोने अख्ख्या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आई अन् दोन जुळ्या मुलांच्या मृत्यूने सर्वांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला असेल.

Uttarakhand Chamoli landslide mother twins death
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे सोशल मीडिया हॅक, खात्यावर पाकिस्तानचे व्हिडिओ

बापाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर -

मिळालेल्या माहितीनुसार, नंदानगरमध्ये बचाव पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. मलब्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जातोय. त्यावेळी तीन मृतदहे मिळाली. दोन्ही जुळी मुलं आईच्या छातीला चिपकलेले होते. येथील कुंवर सिंह परिवारातील या तिघांचा अतिशय करूण अंत झाला. १६ तास मलब्याखाली अडकल्यानंतर कुवंर सिंह जिवंत मिळाले. पण त्यांच्यासाठी सर्वस्व असणारी बायको अन् दोन्ही मुलं या जगात नव्हती. बायको अन् मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच डोळ्यातून अश्रूंचा पूर आला.

Uttarakhand Chamoli landslide mother twins death
Amul Price Cuts : आनंदाची बातमी! तूप ₹४० स्वस्त, अमूलने ७०० उत्पादनांच्या किमती केल्या कमी

१७ सप्टेंबर रोजी उत्तराखंडमधील नंदानगरमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडला. या पावसामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा संसार उघड्यावर आला. शेतीचे नुकसान तर झालेच. पण घरे दारेही पडली. या दुर्घटनेत ८ जण बेपत्ता झाल्याचे समोर आले. तात्काळ SDRF आणि NDRF, स्थानिक बचाव पथकाकडून सर्च ऑपरेशन हातात घेण्यात आले. १८ तारखेला कुंवर सिंह यांना वाचवण्यात यश आले. पण दुसऱ्या दिवशी कुंवर सिंह यांच्या दोन जुळ्या मुलांचा आणि बायकोचा मृतदेह मिळाला. आईच्या कुशीत दोन्ही जुळी मुलं चिखलात माखलेली होती. दे दृश्य पाहून प्रत्येकाचा थरकाप उडला. दोन्ही मुलं फक्त १० वर्षांची होती. आयुष्य सुरूवात होण्याआधीच काळाने हिरावले. आईने जिवाच्या आकांताने शेवटपर्यंत पोटच्या गोळ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण निसर्गाच्या प्रकोपापुढे तीही हारली. तिघांचाही करूण अंत झाला.

Uttarakhand Chamoli landslide mother twins death
MSRTC Jobs : एसटी महामंडळात मोठी भरती, तब्बल १७४५० जागा भरणार, पगार ३० हजारांच्या पुढे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com