Ram Rahim News : मोठी बातमी! राम रहीम पुन्हा एकदा तुरूंगाबाहेर; २१ दिवसांची फर्लो मंजूर, काय आहे प्रकरण?

Gurmeet Ram Rahim Came Out From Sunaria Jail for 21 day furlough : हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला पुन्हा एकदा फर्लो मिळाली आहे. त्यामुळे तो आता २१ दिवस तुरूंगाबाहेर राहणार आहे.
राम रहीम
Ram Rahim NewsSaam Tv
Published On

मुंबई : हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर आलाय. हरियाणा सरकारने त्यांना २१ दिवसांची फर्लो रजा दिलीय. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. २ दिवसांपूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला राम रहीमची विचारसरणी समजून घेऊनच त्याला फर्लो किंवा पॅरोल मंजूर करण्यास सांगितलं होतं.

राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा फर्लो रजा मिळाली (Haryana News) आहे. राम रहीमला २१ दिवसांची फर्लो मिळाली असून, आज तो सुनरिया तुरुंगातून बाहेर आलाय. राम रहीमची मंगळवारी आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलीस संरक्षणात हरियाणाच्या सुनारिया तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बर्नावा आश्रमात फर्लो रजेचा कालावधी घालवणार असल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळतेय.

२१ दिवसांची फर्लो रजा

बलात्कार प्रकरणात दोषी असलेला गुरमीत राम रहीम सिंग याने जून २०२४ मध्ये पुन्हा एकदा फर्लो (furlough) रजेची मागणी केली होती. राम रहीमने २१ दिवसांच्या फर्लोसाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याआधी फेब्रुवारीमध्ये हायकोर्टाने हरियाणा सरकारला डेरा सच्चा सौदा प्रमुखाला त्याच्या परवानगीशिवाय पॅरोल देऊ नये, असं सांगितलं (Ram Rahim News) होतं. त्यावेळी उच्च न्यायालयात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये डेरा सच्चा सौदा प्रमुखाच्या तात्पुरत्या सुटकेला आव्हान देण्यात आलं होतं.

राम रहीम
Gurmeet Ram Rahim Singh : राम रहीमला तीन आठवड्यांची रजा, पंजाबमधील राजकीय समीकरणं बदलणार ?,पाहा व्हिडीओ

राम रहीम कोणत्या प्रकरणात शिक्षा भोगतोय?

राम रहीमवर सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तो याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं होतं. याशिवाय डेरा माजी व्यवस्थापक रणजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीमला देखील न्यायालयाने जन्मठेपेची (Sunaria Jail) शिक्षा सुनावली होती.

फर्लो रजा म्हणजे काय?

फर्लो रजा म्हणजे संचित रजा होय. फर्लो रजा ही सुट्टीसारखा असते. यामध्ये कैदी काही दिवसांसाठी सोडला जातो. फर्लो रजेचा कालावधी कैद्याच्या शिक्षेपासून काहीसा दिलासा म्हणून पाहिली जाते. ही रजा फक्त शिक्षा झालेल्या कैद्यांसाठीच उपलब्ध आहे. फर्लो सहसा दीर्घकाळ शिक्षा भोगलेल्या कैद्याला दिली जाते. प्रत्येक राज्यात फर्लो रजेबाबत वेगवेगळे नियम आहेत. उत्तर प्रदेशमध्ये फर्लो रजा देण्याची तरतूद नाहीये.

राम रहीम
Ram Rahim News : मोठी बातमी! रणजीत हत्या प्रकरणात बाबा राम रहीमची निर्दोष सुटका; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com