Haryana Factory Blast : हरियाणात फॅक्टरीत मोठा स्फोट; बॉयलर फुटल्याने ४० कर्मचारी जखमी

Haryana Factory Blast News : हरियाणाच्या रेवाडी इंड्रस्ट्रिया भागातील धारुहेडा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हरियाणाच्या लाइफ लाँग फॅक्ट्रीत बॉयलर फुटल्याने ४० कर्मचारी जखमी झाले आहेत.
Haryana Factory Blast
Haryana Factory Blast Saam tv
Published On

haryana factory blast Update :

हरियाणाच्या रेवाडी भागातील धारुहेडा येथे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हरियाणाच्या लाइफ लाँग फॅक्टरीत बॉयलर फुटल्याने ४० कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेत काही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे काही अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (Latest Marathi News)

हरियाणाच्या लाँग लाईफ फॅक्टरीत स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

Haryana Factory Blast
Lok Sabha Election 2024: '...तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू', लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

लाँग लाईफ फॅक्टरीतमध्ये स्पेयर पार्ट्स तयार केले जातात. या घटनेबाबत सिव्हिल सर्जन डॉ. सुरेंद्र यादव यांनी म्हटलं की, 'धारूहेडाच्या फॅक्टरीतमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे आम्ही रुग्णालयाला सावध केलं आहे. घटनास्थळी रुग्णवाहिकी पाठवली आहे. या घटनेत काही कर्मचारी होरपळले आहेत. तर या घटनेत ४० कर्मचारी जखमी झाले आहेत. या स्फोटात एका कर्मचाऱ्याची स्थिती गंभीर असून त्याला उपचारासाठी इतरत्र हलविलं आहे.

Haryana Factory Blast
Uttar Pradesh Firing : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार; एक कॉन्स्टेबल जखमी

खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. फॅक्टरीत स्फोट होऊन काही कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील जखमी कर्मचारी लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थन करतो. सरकारने तातडीने या घटनेतील जखमींना उपचार आणि मदत उपलब्ध करून द्यावी, अशी पोस्ट हुड्डा यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com