केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावरून देशात राजकीय वातावरण तापलंय. आधीच व्होट चोरीवरून विरोधक आक्रमक झालेले असताना आता ज्ञानेश कुमारांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. केरळचे माजी मुख्य सचिव जिजी थॉम्पसन यांनी ज्ञानेश कुमारांबाबत खळबळजनक दावा केलाय.
माजी मुख्य सचिवांचा खळबळजनक दावा
"2016 मध्ये मी सेवेतून निवृत्त होणार होतो. एका विमान प्रवासादरम्यान ज्ञानेश कुमार यांनी माझ्या भविष्यातील योजनांबद्दल विचारणा केली होती. तेव्हा, कुमार यांनी सुचवले की मी केरळमधून भाजपचा उमेदवार म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवू शकतो. मी केंद्रीय मंत्रीही होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. मला त्यात रस नसल्यामुळे मी ती ऑफर नाकारली. विशेष म्हणजे, ही ऑफर कोणत्याही भाजप नेत्याकडून न येता एका कार्यरत IAS अधिकाऱ्याकडून येणं, ही बाब आश्चर्यकारक होती."
जिजी थॉम्पसन यांच्या दाव्यानंतर विरोधक आक्रमक झालेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आणि सरकारवर जोरदार निशाणा साधलाय...
राहुल गांधींचा आयोग-सरकारवर हल्लाबोल
आधी शासकीय सेवेत असताना ज्ञानेश कुमार यांचा वापर भाजपाकडे उमेदवार आणण्यासाठी केला गेला. त्यानंतर मोदी आणि शाह यांनी त्यांना पंच बनवून निवडणुकांचं 'मॅच फिक्सिंग' करण्याचं काम सोपवलं.
तर निवडणूक संस्थांमध्ये सर्वोच्च पदांवर असलेल्या लोकांचा विशिष्ट राजकीय पक्षाकडे कल असल्याचा आरोप खासदार प्रियंका गांधींनी केलाय.. मात्र, माजी मुख्य सचिवांच्या दाव्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं थॉमसन यांना सत्ताधारी काँग्रेसच्या UDF आघाडीचे भ्रष्ट अधिकारी म्हटले होते. एव्हंढच नव्हे तर UDF आघाडीने नंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केरळ भाजपनं केलाय...
खरंतर, देशासह राज्यात विरोधकांकडून ज्ञानेश कुमारांविरोधात जनमोर्चा काढला जाणार आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि निपक्षपातीपणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ज्ञानेश कुमारांवर भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातोय, या आरोपाला सचिवांच्या दाव्यानंतर आता अधिक बळकटी मिळण्याची शक्यता आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.