पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून मुख्यमंत्री भगवंत मान यांचे मावस भाऊ ज्ञान सिंग मान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सौनी आणि पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. भाजपचे कमळ हाती घेताच त्यांनी भगवंत मान यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मी भगवंत मान यांच्या मावशीचा मुलगा आहे. ते माझे चुलतभाऊ आहे. मी 2014 पासून त्यांच्यासोबत होतो. पण आम आदमी पक्षात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. दिल्लीहून येऊन काही लोक मनमानी करत होते. त्यामुळे आपण पक्ष सोडला असल्याचे ते म्हणाले. तसेच पंजाबमध्ये भाजप वाढवण्यासाठी काम करेल असे ही ते म्हणाले.
पंजाबचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी दावा केला आहे की ज्ञान सिंग मान हे भगवंत मान यांच्या घराशेजारी राहतात. बजिंदर सिंह ढाबा चालवतात आणि पंजाब सरकारने त्यांच्या ढाब्यावर जीएसटी छापा टाकला होता असा आरोप त्यांनी केला. सुनील जाखर यांनी आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत म्हटले की, हा पक्ष सतत ED च्या छाप्यावर बोलत असतात. पण भगवंत मान यांनी स्वतःच्या भावाच्या हॉटेलवरच छापा टाकला. तसेच आपच्या नेत्यांनी लुधियाना आणि अमृतसरमध्ये गुंडगिरी करत आहे.
पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री भगवंत मान देखील आता घरावर भाजपचा झेंडा फडकवतील. त्यांच्या या विधानाने पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक पार होणार असून त्यापूर्वी आम आदमी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आधीच पक्षाला मोठा धक्का बसला होता. आता आज झालेल्या राजकीय घडामोडीमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.