Firing: हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५ जणांचा जागीच मृत्यू

Firing In Hotel: आसाममध्ये एका हॉटेलमध्ये रात्री अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत.
Firing: हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५ जणांचा जागीच मृत्यू
Firing In Hotel Saam Tv
Published On: 
  • गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना

  • गुवाहाटी गोळीबारात पाच जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी

  • परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार झाल्याची पोलिसांची माहिती

आसाममध्ये गोळीबाराची भयंकर घटना घडली. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये रात्री अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. ही घटना गुवाहाटीच्या बोरा सर्विस भागातील हॉटेल विलासमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबाराचे कारण आणि हेतू अद्याप समजलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उलुबारी परिसरात घडली. गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. जखमींमध्ये हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुवाहाटीचे पोलिस आयुक्त पार्थ सारथी महंत यांनी गोळीबारात पाच जणांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'आज गुवाहाटीच्या मध्यभागी एक दुर्दैवी घटना घडली. आम्हाला पाच मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहेत. आम्ही लवकरच गुन्हेगारांना पकडू.'

Firing: हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५ जणांचा जागीच मृत्यू
Firing In Hotel: हॉटेलमध्ये घुसून बेछुट गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, शहरात खळबळ

हल्लेखोराने हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. त्याला रोखण्यासाठी इतर जण गेले असता त्याने त्यांनाही सोडले नाही. या हॉटेलचे मूळ मालक हेलेना भराली आहेत ज्यांनी ही मालमत्ता विविध व्यक्तींना भाड्याने दिली आहे. गुवाहाटी पोलिस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत परवानाधारक ३२-बोर पिस्तुलाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आसाम काँग्रेसने राज्यातील सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

Firing: हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५ जणांचा जागीच मृत्यू
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफला टार्गेट करण्यामागचं नेमकं कारण काय? गोळीबार प्रकरणात नवे खुलासे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com