Shocking : तब्येत बिघडल्याचं नाटक, पोलिसांनी दार उघडताच १७ कैद्यांचे पलायन

Tamilnadu Theni Jail News : तमिळनाडूतील थेनी कारागृहातून १७ कैदी फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांवर हल्ला करून कैद्यांनी पलायन केल्याची माहिती असून, एका कैद्याला अटक करण्यात आली आहे.
tamil nadu theni jail 17 prisoners escape
tamil nadu theni jail 17 prisoners escapeAI Image
Published On: 
Summary
  • तमिळनाडूतील थेनी कारागृहातून १७ कैदी पळाले

  • कर्मचाऱ्यांवर हल्ला करून कैदी पळाल्याची माहिती

  • पोलिसांनी शोधमोहीमेदरम्यान एका फरार कैद्याला ताब्यात घेतले

  • १६ कैद्यांना पकडण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

तामिळनाडू राज्यातील थेनी जिल्ह्यातील कारागृहातून १७ कैदी पळून गेल्याची घटना समोर आल्याने पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. कारागृहातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून कैद्यांनी पळ काढल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली असून, फरार कैद्यांपैकी एका कैद्याला अटक करण्यात यश आले आहे. उर्वरित कैद्यांचा शोध घेण्यासाठी १७ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित १७ कैदी एकाच कोठडीत बंद होते. एका कैद्याची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कारागृहातील कर्मचारी कोठडीकडे गेले. त्यावेळी कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि या गोंधळाचा फायदा घेत त्यांनी कारागृहातून पळ काढला. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

tamil nadu theni jail 17 prisoners escape
Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

दक्षिण विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजयेंद्र बिदरी यांनी शोधमोहीमेदरम्यान एका फरार कैद्याला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. इतर कैद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तपासणी आणि गस्त वाढवली आहे. दरम्यान, शेजारील डिंडीगुल जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने १६ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. डिंडीगुलचे पोलीस अधीक्षक एस. जयकुमार यांनीही सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे सांगितले.

tamil nadu theni jail 17 prisoners escape
Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

फरार कैद्यांमध्ये लिंगम, राजा सिंगंधर, करुप्पसामी, सिलंबरसन, तिरुपती, मेंजीसुंदरम, सबरी, पोन मुथु, निजांत, कार्तिक राजा, मुगिलन, सेल्वा, तरुण, राजकुमार, प्रवीण, मुथु इलंगो आणि राजुवीन यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती इडुक्की, मदुराई आणि डिंडीगुल जिल्ह्यांतील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. संबंधित कैद्यांचे फोटो सुद्धा पोलिसांमध्ये वाटण्यात आले असून, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. फरार कैद्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांकडून व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com