तुम्हाला रावणासारखी १०० तोंडं आहेत काय? खरगेंनी केली मोदींची रावणाशी तुलना

गुजरात निवडणुकीच्या प्रचार सभेत मल्लिकार्जुन खरगेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
gujarat vidhansabha election 2022 Congress BJP Mallikarjun Kharge
gujarat vidhansabha election 2022 Congress BJP Mallikarjun Kharge SAAM TV

Mallikarjun Kharge On Narendra Modi : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याआधी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधतानाच, त्यांची तुलना रावणाशी केली.

काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी प्रत्येकवेळी स्वतःबद्दलच सांगतात. प्रत्येक मुद्द्यावर बोलताना मोदींचा चेहरा बघून मतदान करा असं सांगतात. तुमचा चेहरा किती वेळा बघायचा? नगरपालिका निवडणुकीत तुमचा चेहरा बघायचा, विधानसभा निवडणुकीत तुमचाच चेहरा, लोकसभा निवडणुकीतही तुमचाच चेहरा बघायचा. प्रत्येक ठिकाणी तुमचाच चेहरा बघावा काय. किती चेहरे आहेत? रावणासारखे तुमची १०० तोंडे आहेत काय?' (Gujarat Vidhansabha Election)

gujarat vidhansabha election 2022 Congress BJP Mallikarjun Kharge
Amit Shah: "बंडखोरांशी प्रेमाने, आपुलकीने बोला"; गुजरात निवडणुकीत अमित शहांची 'गांधीगिरी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केलेल्या कामांवर काहीही बोलत नाहीत. भाजपमध्ये फक्त न फक्त जुमले आहेत. खोटं अन् नुसतं खोटं बोलणे हेच या जुमल्यातून दिसतं. हे केवळ खोटं बोलतात. वर्षाला २ कोटी रोजगार देऊ असं सांगितलं. गुजरातमध्ये कुणाला रोजगार मिळाला काय? असा प्रश्न खरगे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान मोदींना उद्घाटने करण्याची सवय जडलेली आहे. कुणीही काहीही उभारलं तरी, त्याला चुना लावून, रंगरंगोटी करून त्याचे उद्घाटन करतात. त्यानंतर हे मी केलं म्हणून सांगतात. ते जन्माला येण्याआधी अहमदाबाद, सूरतमध्ये एखादा प्रोजेक्ट असेल तर त्यावरही रंगरंगोटी करून त्याचे उद्घाटन मी केले, असे ते सांगतील, असा हल्लाबोलही खरगे यांनी केला. (Latest Marathi News)

gujarat vidhansabha election 2022 Congress BJP Mallikarjun Kharge
Gujrat Election 2022 : सूरतमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोमध्ये दगडफेक

गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान

गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. १८२ जागांसाठी राज्यात १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येईल. ८ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. याच दिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. २७ वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप या निवडणुकीत पुन्हा जोर लावत आहे. तर भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे प्रयत्न आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com