

गुजरातच्या अहमदाबादमधील एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महमूदपुरा भागातील 'टॅलेंट फायरवर्क्स' कारखान्यात लागलेल्या आगीदरम्यान झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला. या घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज सुमारे ५ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला.
स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की कामगारांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. जखमींपैकी चौघांना उपचारासाठी एल.जी. (LG) रुग्णालयात आणि तिघांना असरवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ही फॅक्टरी वस्त्राल येथील आरएएफ (RAF) कॅम्पच्या मागे आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच तिथे तैनात असलेले जवान तातडीने घटनास्थळी धावले. अग्निशमन दलाचे पथक पोहोचण्यापूर्वीच त्यांनी जखमींना आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. सध्या पाचहून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच सध्या 'कूलिंग'ची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांसाठी २ लाख रुपये आणि जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट केली की, "गुजरातच्या अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. दुःखाच्या या कठीण प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.