

गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. वलसाडच्या छिपवाड येथे हमसफर एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. जनरेटर असलेल्या डब्ब्याला आग लागली आहे. आग लागल्याने घटनास्थळी प्रवाशांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली. जनरेटर असलेल्या ट्रेनच्या डब्ब्याला आग लागल्यावर प्रवाशांनी भरलेल्या डब्ब्याकडे आग वळू लागली. त्यामुळे जनरेटर असलेला डब्बा वेगळा करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी याबाबत दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, वलसाडमधून जात असताना तिरुचिरापल्ली जंक्शन ते श्री गंगानगर जंक्शनपर्यंत हमसफर एक्सप्रेस क्रमांक 22498 च्या पॉवर कार/ब्रेक व्हॅन कोचमध्ये आग आणि धूर निघत होता. या अपघातात डब्यातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
ट्रेनमध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी जेकोट रेल्वे स्थानकावर दाहोद आनंद 9350 मेमू ट्रेनमध्ये इंजिनला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी आगीने रौद्र रुप धारण केल्याने ट्रेनमधील आगीच्या ज्वाळा पुढील डब्ब्यातही पसरल्या होत्या.
महाराष्ट्रात बुलढाणा येथे झालेली आगीची घटना देखील सर्वाधिक भयंकर होती. यामध्ये विदर्भ ट्रॅवल्सला आग लागून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. रात्री झोपेत असतानाच अपघात घडला आणि बसने पेट घेतला यामध्ये मोठी जीवितहानी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.