विश्वचषक २०२३ स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक उरले असताना टीम इंडियाने मोठा पराक्रम केला आहे. मोहाली येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर पाकिस्तानला तगडा झटका बसला आहे. (Latest Marathi News)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला (Sport News) शुक्रवारपासून (२२ सप्टेंबर) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे झाला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार के.एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
मोहमद शमीच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला. शमीने घेतलेल्या ५ विकेट्स जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला २७६ धावांवरच रोखलं. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८.४ षटकात २८१ धावा करत सामना ५ विकेट्सनी आपल्या खिशात घातला.
विशेष बाब म्हणजे टीम इंडियाने (Team India) एकाच दगडात दोन पक्षी मारले. ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने पाकिस्तानलाही मोठा धक्का दिला. या विजयासह टीम इंडियाने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर-१ असण्याचा बहुमान मिळवला.
टीम इंडिया आधीच आयसीसी टी २० आणि आणि टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होती. आता ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून भारताने वनडेत देखील नंबर-१ बनण्याचा बहुमान मिळवला आहे. दुसरीकडे टीम इंडियाच्या विजयाने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा संघ वनडेत पहिल्या क्रमांकावर होता.
मात्र, भारताच्या विजयानंतर पाकिस्तानची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. एकाचवेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याचा कारनामा करणारा भारतीय संघ हा दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी २०१४ साली दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.