National Sports Day 2023 : फक्त खेळच नाही तर या गोष्टींच्या माध्यमातुन क्रीडा क्षेत्रात करु शकता झक्कास करिअर, हे वाचुन आजमवा तुमचं नशीब

Career In Sports : दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस आपण दरवर्षी क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.
National Sports Day 2023
National Sports Day 2023 Saam Tv
Published On

National Sports Day : दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस आपण दरवर्षी क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. मेजर ध्यानचंद हे भारतीय फील्ड हॉकी संघाचे माजी खेळाडू आणि कर्णधार होते.

खेळणे हे प्रत्येकांचा आवडीचा विषय (Topic) आहे. आवडीचा असला की मग आपल्या त्या क्षेत्रात काम करण्याची मजाच वेगळी असते. स्पोर्ट्स डे 2023 च्या निमित्ताने खेळातही चांगले करिअर करता येते हे पाहूयात. तुम्‍हाला अशाच काही क्षेत्रांबद्दल सांगणार आहोत जिथं तुम्‍ही तुमचं करिअर सहज बनवू शकता.

National Sports Day 2023
Career Growth Tips: करिअरसाठी ठरतील घातक; 'या' ७ सवयी आजच सोडा..

खेळात करिअर करण्यासाठी हे गुण असले पाहिजे

  • शिस्त

  • कठीण परिश्रम

  • लक्ष केंद्रित

  • इंटरपर्सनल स्कील

  • निर्णय घेणे

  • शारीरिक क्षमता

या क्रीडा क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता

क्रीडा प्रशिक्षक -

क्रीडा प्रशिक्षक किंवा प्रशिक्षक अशी व्यक्ती आहे जी एखाद्या विशिष्ट खेळात (Game) लोकांना प्रशिक्षण आणि सूचना देते.

National Sports Day 2023
Chanakya Niti About Career: कमी वेळेत करिअरला योग्य दिशा द्यायची आहे? चाणक्यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

स्पोर्ट्स आणि फिटनेस न्यूट्रिशनिस्ट -

खेळाडूंना योग्य आहार सांगणे हे त्यांचे काम (Work) आहे, जेणेकरून खेळाडूंना स्टॅमिना आणि एनर्जीची कमतरता भासणार नाही आणि ते अधिक चांगली कामगिरी करत राहतील.

स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट -

स्पोर्ट्स फिजिओथेरपी प्रोफेशनल खेळाडूंना दुखापतीतून बरे होण्यास आणि कमी करण्यास मदत करतो. तो दुखापतीचे आकलन करतो आणि त्यानुसार थेरपी देतो.

National Sports Day 2023
Career Tips: 12वी नंतर पुढे काय?, तुम्ही या क्षेत्रात करू शकता चांगले करिअर; काय आहे संधी घ्या जाणून!

स्पोर्ट्स मार्केटिंग मॅनेजर -

त्यांचे काम मुख्यत्वे खेळाची जाहिरात करणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे. ते बाजारावर संशोधन करतात, अहवाल तयार करतात आणि त्यानुसार रणनीती बनवून काम करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com