Career Growth Tips: करिअरसाठी ठरतील घातक; 'या' ७ सवयी आजच सोडा..

Gangappa Pujari

यशस्वी...

आयुष्यात प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येक व्यक्ती आपली ध्येय, स्वप्न गाठण्यासाठी कष्ट घेत असतो. प्रयत्न करत असतो.

सवयी सोडा...

परंतु, यशस्वी होण्यासाठी फक्त कष्ट आणि प्रयत्नच गरजेचे नाहीत तर आपल्या दैनंदिन जीवनातही काही सवयी लावून घेण्याची, किंवा सवयी सोडण्याची गरज असते.

अनादर

दुसऱ्यांच्या विचारांचा, मताचा अनादर करणे हे वाईट गोष्ट आहे. वडिलधाऱ्यांचा आदर केल्यानेच आपण यशस्वी होऊ शकतो.

भांडणे

कोणत्याही गोष्टीवरुन सतत भांडण करणे ही सुद्धा वाईट गोष्ट आहे. अशाने विनाकारण शत्रु तयार होतात.

नकारात्मक विचार-

सतत स्वतःबद्दल वाईट किंवा नकारात्मक विचार करत असाल तर ती सवय आजच बदला. कारण नकारात्मक विचाराने माणूस कमकुवत होतो.

आळस-

आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळशीपणा असेल तर आपली इच्छित स्वप्न आणि ध्येय कधीच गाठता येत नाहीत.

चुका-

चुका होतात, मात्र वारंवार त्याच चुका करणे योग्य नाही. झालेल्या चुकांमधून शिकून पुढे जाणे हे यशस्वी व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे.

खोटे बोलणे-

वारंवार खोटे बोलण्याची सवय अत्यंत वाईट. खोट बोलण्याने अनेकदा मोठे नुकसान होते, त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही.

टाईमपास

विनाकारण नको त्या गोष्टींवर वेळ वाया घालवण्याची सवय आजच सोडा. टाईमपास करण्याचा हा गुण आपल्याला यशाच्या मार्गावरुन दूर नेतो.

NEXT: अदितीचा मराठमोळा लूक, पाहा फोटो..

Aditi Dravid Photoshoot In Saree | Saamtv
येथे क्लिक करा