गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील लांबा गावात एका कॅन्सरग्रस्त व्यक्तीने आपल्या दोन निरागस मुलांची हत्या करून नंतर स्वतःची देखील हत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय मेरामन छेत्रिया गेल्या पाच वर्षांपासून कॅन्सरने पीडित होता. त्याला आपल्या मृत्यूच्या वेळी मुलांचा भविष्य कसे होईल याची सतत चिंता होती. या मानसिक त्रासामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
कल्ल्याणपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक टी.सी. पटेल यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी छेत्रियाने आपल्या घरात पाच वर्षांच्या मुली व तीन वर्षांच्या मुलाला विषारी पदार्थ देऊन मारले आणि नंतर स्वतःने देखील त्याच विषारी पदार्थाचे सेवन करत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तीनही मृतदेह जप्त करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. पोलिस अधिकारी म्हणाले की, सदर घटना हादरवून टाकणारी आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू सुरू आहे.
कॅन्सर ही सामान्य पेशींमधील जीनमध्ये बदल होणे यामुळे सुरू होते. त्यामुळे पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि गांठ तयार होऊ शकते. हि गांठ बिनाइन (निरुपद्रवी) किंवा मॅलिग्नंट (घातक) असू शकते. मॅलिग्नंट ट्यूमर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो, ज्याला ‘मेटास्टेसिस’ म्हणतात. भारतात फुफ्फुस, स्तन, तोंड, गर्भाशय ग्रीवा व पोटाचा कॅन्सर सर्वाधिक सामान्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.