Shocking : जनगणनेसाठी निघालेल्या शिक्षिकेसोबत भयंकर घडलं! मुख्याध्यापकाने केली हत्या; नंतर मृतदेह जाळला

Gujarat Crime News : अहमदाबादमध्ये जनगणना ड्युटीवर गेलेल्या शिक्षिकेची पतीने हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
AHMEDABAD TEACHER MURDER CASE: HUSBAND KILLS WIFE DURING CENSUS DUTY, BURNS BODY TO DESTROY EVIDENCE
AHMEDABAD TEACHER MURDER CASE: HUSBAND KILLS WIFE DURING CENSUS DUTY, BURNS BODY TO DESTROY EVIDENCESaam Tv
Published On
Summary
  • जनगणना ड्युटीवर गेलेल्या शिक्षिकेची पतीने केली हत्या

  • आरोपी सरकारी शाळेचा मुख्याध्यापक असून त्याला अटक

  • हत्या केल्यानंतर मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

  • कौटुंबिक वादातून हत्या

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जनगणना कामासाठी घराबाहेर पडलेल्या शिक्षिकेची तिच्याच पतीने हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याचे त्याने सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिक्षिकेचे नाव रीना जाला (वय ४५) असे असून त्या चालोडा प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या. त्यांचे पती बलदेव हे खत्रीपुर गावातील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. बुधवारी सकाळी दोघेही जनगणना ड्युटीसाठी एकाच स्कूटरवरून घराबाहेर पडले होते. मात्र काही वेळानंतर रीना अचानक बेपत्ता झाल्याचे सांगत बलदेवने पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, त्याच दिवशी ढोलका परिसरातील नर्मदा कालव्याजवळ एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला.

AHMEDABAD TEACHER MURDER CASE: HUSBAND KILLS WIFE DURING CENSUS DUTY, BURNS BODY TO DESTROY EVIDENCE
Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी घेतली लाच

हा मृतदेह गावातील एका शेतकऱ्याने पाहिला आणि त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर ढोलका ग्रामीण पोलीस, सर्व्हिलन्स पथक आणि अहमदाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असताना तो रीना जाला यांचाच असल्याचे उघडकीस आले. तपासादरम्यान पोलिसांना बलदेवच्या जबाबात वेगळेपणा आढळून आला. त्यामुळे तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान बलदेवने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.

AHMEDABAD TEACHER MURDER CASE: HUSBAND KILLS WIFE DURING CENSUS DUTY, BURNS BODY TO DESTROY EVIDENCE
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

पोलिसांच्या माहितीनुसार, जनगणना कामासाठी जात असताना पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर बलदेवने स्कूटर कालव्याजवळील निर्जन ठिकाणी नेली आणि संतापाच्या भरात दगडाने रीना यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर ओळख लपवण्यासाठी स्कूटरमधील पेट्रोल काढून मृतदेहावर शिंपडले आणि तो जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने पत्नी हरवल्याची खोटी तक्रार दाखल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईने आरोपीचा ढोंगी कारभार समोर आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com