गुजरातमध्ये ब्रिजचे दोन तुकडे, अनेक वाहने नदीत पडली, ३ जणांचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

bridge collapse in Gujarat: गुजरातमध्ये पूल कोसळल्यामुळे वाहने नदीत पडली. तीन जणांचा मृत्यू, अनेकांचा शोध सुरू आहे. बचावकार्य सुरु असून, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
Gujarat’s Gambhira Bridge collapsed Viral Video
Tragic bridge collapse in Gujarat: Vehicles seen submerged in the Mahisagar river as rescue efforts continueSaam TV News Marathi
Published On

Gujarat’s Gambhira Bridge collapsed Viral Video : मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये ब्रिजचे दोन तुकडे झाले अन् अनेक वाहने नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरील व्हिडिओ पाहाता मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच बचावपथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. किती वाहने खाली पडली, किती लोक नदीत पडले आहेत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, चार वाहने नदीत पडली आहेत, त्यामध्ये ट्रक आणि कारचाही समावेश आहे.

आणंद आणि वडोदरा या दोन जिल्ह्यांना जोडणारा गंभीरा पूल बुधवारी सकाळी अचानक कोसळला. पूलावरून वाहने जात असताना ही दुर्घटना घडली, त्यामुळे अनेक वाहने नदीत कोसळली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अनेक वाहने नदीत कोसळल्याने मोठ्या जीवितहानीची भीती आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. त्याशइवाय वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

Gujarat’s Gambhira Bridge collapsed Viral Video
Bharat Bandh Today : २५ कोटी कामगार संपावर, आज भारत बंद, कोण कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

गंभीरा ब्रिजमध्येच तुटून दुर्घटना झाल्याचे समजताच बचावपथकाने तात्काळ धाव घेतली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिज तुटल्यामुळे नदीत चार वाहने पडली आहेत. बचावपथकाने आतापर्यंत चार जणांना वाचवले आहे. नदीमध्ये इतरांचा शोध घेतला जात आहेत. बचावकार्य अद्याप सुरू आहे.

Gujarat’s Gambhira Bridge collapsed Viral Video
अकोला हादरलं! इन्शुरन्स 'मॅनेजर'वर अत्याचाराचा प्रयत्न, बचावासाठी केला गुप्तांगावर वार

पोलिसांनी काय सांगितले ?

पोलिसांनी सांगितले की, गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात बुधवारी सकाळी एका पुलाचा काही भाग कोसळल्याने किमान चार वाहने नदीत कोसळली. पडारा पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी सांगितले की, आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे, बचावकार्य अजूनही सुरूच आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य महामार्गालगत महिसागर नदीवर असलेला गंभीरा पूल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळला. यामुळे चार वाहने नदीत कोसळली. दोन ट्रक आणि दोन व्हॅनसह अनेक वाहने नदीत पडली. आतापर्यंत आम्ही चार जणांना वाचवले आहे.

Gujarat’s Gambhira Bridge collapsed Viral Video
मोठी बातमी! संजय गायकवाडांची कर्मचार्‍याला बेदम मारहाण, शिंदेंच्या शिलेदाराचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com