थाटामाटात लग्न केलं, हनिमूनच्या काही तासाआधीच नवऱ्याचा मृत्यू; नववधूचं संसार थाटण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं

groom dies just hours after wedding in Amroha : थाटामाटात लग्न झाल्यानंतर हनिमूनच्या काही तासाआधीच नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने नववधधूचं संसार थाटण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
थाटामाटात लग्न केलं, हनिमूनच्या काही तासाआधीच नवऱ्याचा मृत्यू; नववधूचं संसार थाटण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं
Published On
Summary

लग्नानंतर केवळ काही तासात नवरदेवाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा

मृत परवेज आलम उर्फ गुड्डू (४२) याचं लग्न सायमा कादरी (३३) हिच्याशी झाला होता.

रविवारी पहाटे त्याला छातीत दुखू लागलं, रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाला.

वराच्या मृत्यूने नववधूचं संसाराचं स्वप्न अधुरं राहिलं

उत्तर प्रदेश अमरोहा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरोहा जिल्ह्यात लग्नानंतर हनिमूनच्या काही तासाआधीच नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर लग्न घरातील आनंदी वातावरण क्षणात दु:खात बदललं.

नवरदेवाच्या छातीत रविवारी सकाळी ४ वाजता दुखू लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, नवरदेवाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. नवऱ्याच्या मृत्यूने त्याच्या बायकोला मोठा धक्का बसला आहे.

थाटामाटात लग्न केलं, हनिमूनच्या काही तासाआधीच नवऱ्याचा मृत्यू; नववधूचं संसार थाटण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं
Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहा येथील मोहल्ला नौगज येथे परवेज आलम उर्फ गुड्डू (४२) राहत होता. त्याच्यासोबत दोघे भाऊ पप्पू आणि मरहून असलम देखील घरात सोबत राहत होते. परवेजच्या आई-वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. परवेज उर्फ गुड्डू याचं जामा मशि‍दच्या रोडवर पुस्तकांचं दुकान आहे. परवेजचे दोघे भाऊन दुकानात काम करतात.

थाटामाटात लग्न केलं, हनिमूनच्या काही तासाआधीच नवऱ्याचा मृत्यू; नववधूचं संसार थाटण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं
Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

आई-वडिलांच्या निधनामुळे परवेजला लग्न करण्यास उशीर झाला. परवेजचं लग्न मोहम्मद अहमद कादरी यांची मुलगी सायमा कादरी (३३) हिच्याशी झालं. शनिवारी सायंकाळी परवेजचे कुटुंबीय वरात घेऊन सायमाच्या हॉलमध्ये पोहोचले. शनिवारी दोघांचं लग्न झालं. त्यानंतर रविवारी याच हॉलमध्ये परवेज आणि सायमा यांच्या वलिमा (रिसेप्शन) याचा कार्यक्रम होता.

बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी पाहुण्याचा पाहुणचार झाला. निकाह देखील वाचण्यात आला. त्यानंतर रात्री एक वाजता परवेजने बायको सायमाला घरी आणलं. परवेजचं लग्न झाल्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी दोघांचा वलिमाचा कार्यक्रम होता.

थाटामाटात लग्न केलं, हनिमूनच्या काही तासाआधीच नवऱ्याचा मृत्यू; नववधूचं संसार थाटण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं
मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

परवेजला अचानक रविवारी सकाळी ४ वाजता छातीत दुखू लागलं. त्यामुळे परवेजला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी परवेजला मृत घोषित केले. परवेजच्या मृत्यूने त्याच्या जोडीदाराचं संसार थाटण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. परवेजच्या मृत्यूने आनंदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com