Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली आहे.
शुक्रवारी सराफ बाजारात सोन्याच्या भावाने 62 हजारांचा टप्पा पार केला होता. ऐन लग्नसराईत सोन्याच्या भावात तब्बल दीड हजारांनी पुढा वाढ पाहायला मिळाली होती परंतु, आज सोन्याचे दर किंचित कमी झाले आहेत.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,640 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,780 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 77 रूपये आहे. (Gold Silver Price update 8th May 2023)
चेन्नई - 62,080 रुपये
दिल्ली - 61,780 रुपये
हैदराबाद - 61,630 रुपये
कोलकत्ता - 61,630 रुपये
लखनऊ - 61,780 रुपये
मुंबई - 61,630 रुपये
पुणे - 61,630 रुपये
नागपूर - 61,630 रुपये
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.