Gold Silver Price : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold) दरात सातत्याने घट होत आहे. याचाच परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून भारतीय बाजारपेठेत सोने-चांदी दरात घसरण होत आहे. दरम्यान, बुधवारी दरात तेजी आल्यानंतर गुरूवारी सोन्याचे दर पुन्हा घसरले आहे. (Gold Silver Latest Price Today In India)
भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.21 टक्क्यांनी घसरली आहे. सोन्याबरोबर चांदीचे (Silver) दरही घसरले असून गुरुवारी चांदीचा दर 172 रुपयांनी घसरून 57,126 रुपये किलो झाला आहे.
गुरुवारी बाजारपेठ उघडताच 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव प्रतितोळा 105 रुपयांनी घसरून 49,338 रुपयांवर पोहचला. फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा व्यवहार 49,314.00 रुपयांच्या पातळीवरून सुरू झाला. काही वेळातच सोनाचा भाव प्रतितोळा 49,314.00 रुपयांच्या पातळीवर पोहचला होता. मात्र, नंतर त्यामध्ये घसरण झाली. (Gold And Silver Price Today)
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचा भाव
चेन्नई - 50,730 रुपये
दिल्ली - 50,110 रुपये
हैदराबाद - 49,960 रुपये
कोलकत्ता - 49,960 रुपये
लखनऊ - 50,110 रुपये
मुंबई - 49,960 रुपये
नागपूर - 49,990 रुपये
पुणे - 49,990 रुपये
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.