Madhya Pradesh News: बापरे! भावासोबतच्या भांडणात बहिणीनं गिळला मोबाईल, अन् दीड तासांनंतर...

MP Latest News : बहीण-भावाच्या भांडणात मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एका तरुणीने चक्क मोबाईल गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mobile Phone
Mobile PhoneSaam Tv
Published On

Madhya Pradesh Crime News: भांडणामध्ये कोण काय करेल हे सांगता येत नाही. बहीण-भावाची किरकोळ भांडणं तर होत असतात. या भांडणात अनेकदा टोकाची पाऊलं देखील उचलली जात. अशाच प्रकारच्या बहीण-भावाच्या भांडणात मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एका तरुणीने चक्क मोबाईल गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mobile Phone
Chennai Drown News: काळीज पिळवटून टाकणारी घटना!, बुडणाऱ्या एकाला वाचवायला गेले अन् ५ जण बुडाले

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शुक्रवारी एका १८ वर्षांच्या तरुणीचे भावासोबत भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरुन या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आणि तिने मोबाईलच गिळून टाकला. पण तिने मोबाईल गिळल्याचे कोणालाही सांगितले नाही. या मुलीच्या पोटामध्ये दुखू लागले आणि तिची प्रकृती खूपच बिघडली. त्यानंतर तिचे कुटुंबीय तिला ग्वालियर येथील जेएएच रुग्णालयात घेऊन गेले.

डॉक्टरांनी तिची तपासणी केली. या तरुणीच्या पोटाचा एक्सरे काढण्यात आणि सीटी स्कॅन करण्यात आले. हा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या तरुणीच्या पोटात मोबाईल असल्याचे त्यांना दिसून आले. डॉक्टरांनी तात्काळ या तरुणीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल दीड तासांच्या शस्त्रक्रियेनंतर या तरुणीच्या पोटातून मोबाईल सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आला.

Mobile Phone
Odisha News: उतावळा आजोबा, गुडघ्याला बाशिंग...; डॉक्टर-वकील महिलांसह २७ जणींना जाळ्यात अडकवलं अन्...

जीआरएमसी रुग्णालयाचे डॉक्टर नवीन कुशवाह, डॉ. अश्विनी पांडे, डॉ. सुरेंद्र चौहान यांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया करत तरुणीच्या पोटातील मोबाईल तोंडावाटे बाहेर काढला. डॉक्टर नवीन कुशवाह यांनी सांगितले की, शरीरातून मोबाईल बाहेर काढण्याची ही घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. आमच्या टीमने तरुणीच्या पोटातून मोबाईल बाहेर काढला. हा मोबाईल तरुणीच्या पोटाच्या वरच्या भागात अडकला होता.'

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com