

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टानं गुरुवारी त्यांना जामीन मंजूर केला. दिल्ली जल बोर्डाच्या एसटीपी प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणात त्यांना एसीबीने अटक केली होती. २ लाख रुपयांचे एक आणि त्याच रकमेच्या दोन जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे.
सत्येंद्र जैन यांना १८ ऑगस्ट रोजी एसीबीने दिल्ली जल बोर्डाच्या एसटीपी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत आढळून आलेल्या अनियमितता प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल १६ दिवसांनी राऊज एव्हेन्यू कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. (Satyendar Jain gets bail after 16 days in custody) विशेष न्यायाधीश दिग्विजय सिंह यांनी हे आदेश दिले आहेत.
सत्येंद्र कुमार जैन (Satyendar Jain bail) यांच्यासह सहा जणांना एसीबीने अटक केली होती. दिल्ली जल बोर्डाचे माजी सीईओ आणि आयएएस अधिकारी उदित प्रकाश राय, बोर्डाचे माजी सल्लागार अंकित श्रीवास्तव आणि अन्य तीन व्यक्तींचाही यात समावेश होता. कोर्टाने गुरुवारी सत्येंद्र जैन यांना या प्रकरणात तात्पुरता दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाला असला तरी आरोपांतून मुक्तता झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरूच राहील, असे सांगण्यात येत आहे.
एसीबीच्या म्हणण्यानुसार, एसटीपी टेंडर तयार करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक शर्तींचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे त्यातील स्पर्धा मर्यादित झाली. त्यामुळे खास तंत्रज्ञान पुरवाऱ्यांना लाभ मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली. पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत कोणताही अभ्यास करण्यात आला नाही, असेही तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. तांत्रिक शर्ती ठेवल्यामुळे संपूर्ण टेंडर प्रक्रिया प्रभावित झाली, असा आरोपही आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.