Chennai News: गॅस गळतीमुळे घरात भीषण अग्नितांडव, एकाच कुटुंबातील ३ मुलांचा होरपळून मृत्यू

Gas Cylinder Leakage: गॅस सिलिंडरमध्ये गळती झाल्याने घरात आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील तीन मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना चेन्नईजवळील चेंगलपट्टू येथे घडली आहे.
Fire News
Fire NewsSaam Tv
Published On

Children Burnt Due To Gas Cylinder Leakage

चेन्नईजवळील चेंगलपट्टू येथील एका घरात आग (fire) लागली. या आगीत एकाच कुटुंबातील तीन मुलांचा होरपळून मृत्यू (Children Burnt) झाला आहे. या घटनेत मुलांची आई गंभीर भाजली आहे. तिच्यावर किलपॉक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Crime News)

पीडित कुटुंब मूळचं बिहारचं असल्याची माहिती मिळतेय. गॅस लिक झाल्यामुळं आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत (Chennai News) आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीत तिघांचा मृत्यू

गॅस गळतीमुळे (Gas Cylinder Leakage) आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, चेंगलपट्टू रेल्वे स्थानकाजवळ तिच्या पतीला कामाच्या ठिकाणी भेटल्यानंतर ती महिला आपल्या तीन मुलांसह घरी परतली होती. घरी परतल्यानंतर या महिलेने गॅसची शेगडी पेटवली होती. घरात खिडक्या नव्हत्या. महिलेने स्वीच ऑन करताच आग गॅस शेगडी व्यतिरिक्त संपूर्ण घरात पसरली होती. आग लागताच त्यांनी आरडोओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीसाठी धावले.

महिला आणि तिची तिनही मुलं आगीत अडकले होते. शेजाऱ्यांनी त्या चौघांनाही बाहेर काढलं. त्यांना चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेत सात आणि पाच वर्षांच्या मुलांचा मृत्यू (Children Death) झाला आहे. तर त्यांच्या आईला पुढील उपचारासाठी किलपॉक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या घटनेनंतर चेंगलपट्टू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Fire News
Badlapur Railway Fire: बदलापूर स्थानकाजवळ रेल्वेच्या डब्याला भीषण आग; थरारक घटनेचा VIDEO आला समोर

गॅस गळती झाल्यास काय करावे ?

एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळे ज्वलनशील वायू बाहेर पडतात, त्यानंतर असे अनेक मोठे अपघात घडतात. एलपीजी सिलिंडरमधून गळती होणारा गॅस नाकात गेल्यास गुदमरल्यासारखं होऊ ( Burnt Due To Gas Cylinder Leakage) शकतं. तुम्हाला हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. त्यामुळे सिलिंडर गळती झाल्याचं आढळल्यास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे स्फोट होतो.

गॅस गळती झाल्या घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून घर हवेशीर राहील. गॅस पुरवठादाराला गळतीबाबत माहिती (fire news) द्या. गॅस शेगडीजवळ कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेवू नका. एलपीजी रेग्युलेटर नेहमी बंद ठेवा. शॉर्ट सर्किट होऊ शकतं, असं कोणतंही उपकरण चालू करू नका.

Fire News
UP Burning Train: नवी दिल्लीहून दरभंगा जाणाऱ्या एक्सप्रेसला भीषण आग; आगीत अनेक डबे जळून खाक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com