UP Burning Train: नवी दिल्लीहून दरभंगा जाणाऱ्या एक्सप्रेसला भीषण आग; आगीत अनेक डबे जळून खाक

Burning Train: नवी दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला भीषण आग लागली आहे. ट्रेनचे काही डबे जळून खाक झाले असून प्रवाशांना गाडीतून उड्या टाकून जीव वाचवावा लागला आहे.
UP Burning Train
UP Burning TrainSaam Digital
Published On

Burning Train

नवी दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला भीषण आग लागली आहे. ट्रेनचे काही डबे जळून खाक झाले असून प्रवाशांना गाडीतून उड्या टाकून जीव वाचवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमधील इटावाच्या सराय भूपत रेल्वे स्टेशनवर ही दुर्घटना घडली. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ट्रेनच्या डब्यातून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच स्टेशन मास्टरने तात्काळ ट्रेन थांबवली. काही प्रवाशांनी आधीच डब्यातून उड्या टाकल्या होत्या. दरम्यान सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले आहे. बिहारमध्ये छट पूजेचा सण आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी सतर्कता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान घटनेनंतर रेल्वेचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

UP Burning Train
Uttarakhand Tunnel Accident: स्पेशल विमान आणि मशीन....; बोगद्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या ४० कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोठा प्लान

दरम्यान भारतात गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांच सत्र सुरू आहे. दरम्यान समस्तीपूर, भागलपूरवरून जयनगरला जाणाऱ्या एक्स्प्रेमध्ये आग लागली. यात अनेक प्रवाशी जखमी झाल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर आरपीएफच्या जवानांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

UP Burning Train
Haryana News: हरियाणाच्या नूंहमध्ये वायू गळती, 24 कामगारांची प्रकृती खालावली, उपचार सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com