बड्या महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले; लोकायुक्ताची मोठी कारवाई

Female Sub Engineer Caught Taking Bribe In Indore: इंदूर जिल्ह्यातील महू येथे महिला उपअभियंता सावित्री मुवेल यांना १५ हजार रुपयांची लाच घेताना लोकायुक्तांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील मोठी कारवाई मानली जात आहे.
Lokayukta officials arrest a woman sub-engineer while accepting a bribe during a trap operation in Mhow, Indore.
Lokayukta officials arrest a woman sub-engineer while accepting a bribe during a trap operation in Mhow, Indore.Sam tv
Published On

देशात लाचखोर आधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध लोकायुक्तची कारवाई सातत्याने सुरू आहे. जवळपास दर दुसऱ्या दिवशी देशात कुठे ना कुठे भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले जात आहे. तरी देखील लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अशातच आज मध्यप्रदेशमधील इंदूर जिल्ह्यातील महू येथे एका महिला उपअभियांताला लाच घेताना लोकायुक्तांनी सापळा रचत अटक केली आहे.

Lokayukta officials arrest a woman sub-engineer while accepting a bribe during a trap operation in Mhow, Indore.
Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला? वाचा संपूर्ण लिस्ट

लोकायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ग्रामपंचायत यशवंत नगरचे आहे. याठिकाणी 4 लाख रुपये खर्च करून रस्ता बांधण्यात आला होता. रस्ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उपअभियंता सावित्री मुवेल यांनी या प्रक्रियेत अडथळा निर्माण करून पंचायत सचिव रमेशचंद्र चव्हाण यांच्याकडे 15 रुपयांची लाच मागितली. जो पर्यंत पैसे देणार नाही तो पर्यंत बिल आणि पेमेंट मिळणार नाही असे तिने सांगितले.

Lokayukta officials arrest a woman sub-engineer while accepting a bribe during a trap operation in Mhow, Indore.
पिसाळलेल्या हत्तीचा जीवघेणा हल्ला, पायाखाली चिरडलं; भाजपच्या दिग्गज नेत्याचा जागीच मृत्यू, देशात शोककळा

पंचायत सचिव रमेशचंद्र चौहान यांनी यासंदर्भात इंदूर लोकायुक्त कार्यालयात तक्रार दिली. लोकायुक्तने तक्रारीची शहानिशा केली आणि ती खरी असल्याचे आढळल्यानंतर शुक्रवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराला १५ हजार रुपये घेऊन सावित्री मुवेल यांच्याकडे पाठवण्यात आले. जशी आरोपी उपयंत्र्याने लाचेची रक्कम स्वीकारली यावेळी सापळा रचून पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारणा) अधिनियम २०१८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com