Railway Track Blast : भारत-पाक सीमेवर मोठा स्फोट! ट्रेन जाताच रेल्वे ट्रॅक उडाला; संपूर्ण परिसर हादरला

Rajasthan Railway News : राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील अनुपगड-सुरतगड रेल्वे मार्गावर रात्री स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. स्फोटात रेल्वे रुळाखालील सिमेंटचे दोन ठोकळे फुटले असून, ट्रेन गेल्यानंतर सुमारे ४५ मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती आहे.
Rajasthan Railway Track Explosion
Rajasthan Railway Track Explosion
Published On: 

Rajasthan Railway Track Explosion: भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेसेजवळ असलेल्या श्रीगंगानगरमधून एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. सीमावर्ती भागातील रेल्वे ट्रॅकवर एक जोरदार स्फोट झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या ट्रॅकवरून अवघ्या काही वेळापूर्वीच एक ट्रेन गेली होती, त्यामुळे थोडक्यात भीषण दुर्घटना टळली आहे. या अचानक झालेल्या शक्तिशाली धमाक्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर विभाग पूर्णपणे सतर्क झाला. हा घातपात होता का? याचा कसून तपास केला जात आहे.

राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील अनुपगड-सुरतगड रेल्वे रुळावर रात्री झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे रुळाचे दोन सिमेंटचे खांब तुटले. अनुपगड-सुरतगड ट्रेन गेल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या स्फोटाची माहिती मिळताच एटीएस, सीआयडी, श्वान पथक आणि रेल्वेची पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या.

Rajasthan Railway Track Explosion
भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, ४ घातक वेगवान गोलंदाजांना संधी, कुलदीप-सिराज बेंचवरच, पाहा प्लेईंग ११

रेल्वे मार्गावरून एक प्रवासी ट्रेन गेल्यानंतर सुमारे ४५ मिनिटांनी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे रेल्वे रुळाखालील दोन सिमेंटचे ठोकळे पूर्णपणे फुटले आणि रुळांच्या मध्ये २ फूट खोल खड्डा पडला. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ९:४५ वाजता घडल्याची माहिती आहे.

Rajasthan Railway Track Explosion
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; सुरुवातीच्या निकालांत रिपब्लिकन पक्षाची पिछेहाट

या स्फोटामागे कोण आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्या बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. सीमावर्ती भागातील या स्फोटामागे समाजकंटक किंवा राष्ट्रविरोधी शक्तींचा हात होता का? याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. अलीकडेच भिलवाडा येथे स्फोटकांनी भरलेल्या एका पिकअप ट्रकमध्ये स्फोट झाला होता. त्यात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

स्फोटाबाबत पोलीस अधिकारी म्हणाले, "पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. इतर अधिकारीही तिथे उपस्थित होते. एफएसएल आणि एटीएसची पथकेही दाखल झाली आहेत. तपासानंतरच नेमकं काय घडलं हे कळू शकेल. हा बॉम्बस्फोट होता की आणखी काही, हे आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही. आम्ही फक्त घटनास्थळाला भेट दिली आहे आणि हे कसे घडले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.