

IND vs NZ 1st ODI LIVE Score: न्यूझीलंडविरोधातील वनडे मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चार वेगवान गोलंदाजांना घेऊन टीम इंडिया मैदानात उतरली आहे. स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. भारताने ४ वेगवान गोलंदाज प्लेईंग ११ मध्ये खेळवले आहेत. पण यामध्ये मोहम्मद सिराज याला संधी देण्यात आलेली नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेचा पहिला सामना आज ऑकलंडच्या ईडन पार्कवर होत आहे. यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ ने आपल्या नावावर केली होती. आता त्यांची नजर टी-२० नंतर एकदिवसीय मालिकाही जिंकण्यावर असेल. चाहत्यांचे लाडके रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात दिसत असून, चाहत्यांना दोघांकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला.
नाणेफेक जिंकल्यानंतर शुभमन गिल याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो म्हणाला की, वातावरण थोडे ढगाळ आहे आणि षटकांची कपात झाल्यास पाठलाग करणे फायद्याचे ठरेल. येथील परिस्थिती काही इतर ठिकाणांच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेसारखी (जिथे विश्वचषक होत आहे) असणार आहे. आमचे गोलंदाज म्हणून अंशुल, आकिब, गुरनूर आणि अर्शदीप असणार आहेत, तर नमन आणि अक्षर अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतील.
सँटनर म्हणाला की, आम्हाला आणखी एका चांगल्या खेळपट्टीवर पुन्हा खेळावे लागेल. वेळापत्रकानुसार थोडी अधिक फेरबदल करण्यात आली आहे. कॉनवे आज खेळत नाहीये. सायफर्ट, यंग आणि निकोल्स वरच्या क्रमवारीवर फलंदाजीसाठी उतरतील.
दोन्ही संघाची प्लेईंग ११
भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के. एल. राहुल (विकेटकीपर), नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड: टिम सायफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.