शृंगेरी घाटात ट्रकचा भीषण अपघात! आगीचे भयानक लोळ; डोंगराला आग, ड्रायव्हरचा झाला जागीच कोळसा

Beed truck accident : बीडच्या पाटोदा तालुक्यातील शृंगेरी घाटात उसाचा ट्रक खोल दरीत कोसळून पेट घेतला. या भीषण अपघातात चालक सागर इंदलकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ट्रकच्या आगीमुळे डोंगरालाही आग लागली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Beed truck accident
Beed truck accident
Published On: 

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Truck accident in Shringeri Ghat Beed : बीडच्या पाटोदा तालुक्यातील मुगाव मार्गे जाणाऱ्या शृंगेरी घाटात ऊसाचा मोकळा ट्रक (क्र. MH 42 B 8583) ब्रेक फेल झाल्यामुळे खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतल्याने आगीचे भयानक लोळ उठले. ट्रकच्या आगीमुळे परिसरातील डोंगरालाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुगाव येथील युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक अत्यंत खोल दरीत कोसळलेला असल्याने आणि आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे घटनास्थळी पोहोचणे कठीण झाले होते. प्राथमिक पाहणीत ट्रकचालक आढळून आला नव्हता; मात्र मुगाव येथील युवकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता, चालक सागर सोमनाथ इंदलकर हा आगीत होरपळून मृत झाल्याचे दिसून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Beed truck accident
महाराष्ट्र हादरला! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, शिंदे सेनेच्या नेत्यावर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आष्टी पोलीस ठाण्याला कळवले. त्यानंतर आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रक खोल दरीत असल्याने आणि आग मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे बचावकार्य व पाहणी करताना अडचणी येत आहेत.

Beed truck accident
रोहित पाटलांना धक्का, जयंत पाटलांचे गणित बिघडले! जिल्हा बँकेत पडळकरांची एन्ट्री अन्...; विजयी उमेदवारांची यादी

नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करू नये, आगीपासून सुरक्षित अंतर राखावे आणि पोलिसांना तपास व मदतीस सहकार्य करावे, असे आवाहन पाटोदा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.