CM Bhupendra Patel: इंजिनियर, नगरसेवक ते गुजरातचे मुख्यमंत्री...; भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास जाणून घ्या...

Gujrat CM Bhupendra Patel: भूपेंद्र पटेल हे यांनी सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानिमित्ताने आज त्यांच्या राजकीय जीवनाचा घेतलेला संक्षिप्त आढावा.
Gujrat CM Bhupendra Patel
Gujrat CM Bhupendra PatelTwitter/@Bhupendrapbjp
Published On

Gujrat CM Bhupendra Patel News: यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत. 1960 मध्ये राज्याच्या स्थापनेपासून कोणत्याही पक्षाने मिळवलेल्या या सर्वात जास्त जागा आहेत. राज्याच्या स्थापनेपासून गुजरातमध्ये भाजपचा हा सलग सातवा विजय आहे. भूपेंद्र पटेल हे यांनी सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानिमित्ताने आज त्यांच्या राजकीय जीवनाचा घेतलेला संक्षिप्त आढावा.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) दणदणीत विजय मिळवल्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भूपेंद्र पटेल यांचा जन्म १५ जुलै १९६२ साली अहमदाबादमध्ये झाला. त्यांनी अहमदाबादच्या सरकारी पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सदस्यही आहेत. यासोबतच ते मेमनगर येथील आरएसएसद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाल वाचनालयाचे सक्रिय सदस्य आहेत. (Latest Marathi News)

Gujrat CM Bhupendra Patel
Nitesh Rane News: नांदगाव ग्रामस्थांना धमकवणाऱ्या नितेश राणेंना भाजपचा पाठिंबा; बावनकुळेंकडून पाठराखण

मेमनगर नगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत (Election 2022) अहमदाबादमधील घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. 13 सप्टेंबर 2021 ला त्यांनी पहिल्यांदा गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याच्याआधी, 12 सप्टेंबर 2021 ला त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडत घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा ही निवडणूक 1,91,000 इतक्या प्रचंड मतांनी जिंकली.

अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (AMC) च्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि 2010 ते 2015 पर्यंत थलतेज वॉर्डचे नगरसेवक म्हणून काम केलेले पटेल यांना प्रशासनाचा विस्तृत आणि प्रदीर्घ अनुभव आहे. 1995 मध्ये मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी एक दशकाहून अधिक काळ पालिकेची सेवा केली. यासोबतच ते 1999 ते 2000 आणि 2004 ते 2006 या काळात स्थानिक संस्थेचे अध्यक्ष होते.

यासोबतच त्यांनी 2008 ते 2010 दरम्यान अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यानंतर 2010 ते 2015 पर्यंत त्यांनी थलतेज वॉर्डाचे नगरसेवक म्हणून काम पाहिले. या कार्यकाळात त्यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (AMC) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. 2015 मध्ये, त्यांची अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण (AUDA) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2017 मध्ये, घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून 1,17,000 मतांनी मोठ्या फरकाने विजयी होऊन पटेल प्रथमच विधानसभेचे सदस्य झाले होते.

Gujrat CM Bhupendra Patel
संतापजनक! पाकड्यांनी पुन्हा डिवचले; Sevak - The Confessions वेबसिरीजमधून केला हिंदू संतांचा अपमान

दरम्यान यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसला केवळ 17 जागा जिंकता आल्या. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपला आवाहन देण्यासाठी विरोधी पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com