Nitesh Rane Today News: भाजप आमदार नितेश राणे यांनी एका ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका बैठकीत ग्रामस्थांना जाहीर धमकी दिली होती. माझ्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर गावाच्या विकासासाठी निधी देणार नाही असं नितेश राणे जाहीरपणे म्हणाले होते. यावरुन विरोधकांनी रान उठवलं असून नितेश राणेंच्या (Nitesh Rane) वक्तव्याचा निषेध केला आहे. मात्र, नितेश राणेंच्या मागे भाजप पक्ष ठामपणे उभा असल्याचं दिसतंयं. (Kankavli Latest News)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नितेश राणेंची पाठराखण केली आहे. नितेश राणे यांनी धमकी दिली नाही तर राणे यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे.
बावनकुळे म्हणाले की, धमकी वैगेरे असं नसतं. कुठलेही आमदार म्हणतात की, आपल्या गटाचा आपल्या विचाराचा सरपंच आला तर जास्तीत जास्त पैसा मिळेल. नाही आला तरी आपण पैसे देत नाही का? तो नाही आला तरी आपण पैसे देतो. मोदीजींच्या नेतृत्वात कोणत्याही विचारांचा अथवा पक्षाचा असो त्यांना विकासनिधी मिळतो, विकास योजना थांबत नाहीत. (Latest Marathi News)
विकास योजनांसाठी जो इतर पैसा लागतो तो आमदार आणतो. तो आमदार एवढं काम करतो त्यामुले आमदाराच्या साहजिक भावना असतात की, आपल्या गटाचा सरपंच निवडून यावा. आपल्या गटाचा सरपंच आला की दोन पैसे जास्त मिळातात, विकास जास्त होतो. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची गरज नाही असं बावनकुळे हिंगोलीत म्हणाले आहेत. (Chandrashekhar Bawankule Latest News)
कणकवली नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार नितेश राणे हे आले हाेते. यावेळी एका बैठकीत नितेश राणे म्हणाले की, मी सत्तेत असलेला आमदार आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी लागणार निधी हा माझ्या हातात आहे. परंतु माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा निधी देणार नाही हे लक्षात ठेवा. जिल्हा नियाेजन समिती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे मला विचारल्या शिवाय निधी देणार नाहीत हा विषय तुम्ही स्पष्ट करुन घ्या असेही राणेंनी म्हटलं.
राणे साहेबांच्या (narayan rane) तालमीत आम्ही सर्वजण तयार झालाे आहेत. त्यामुळे आपलं जे काही आहे ते स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या विचाराचा सरपंच निवडून द्यावा असेही आवाहन राणेंनी केले.
नितेश राणेंच्या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. "मतदारांना धमकी देऊन सत्तेचा माज कसा असतो हे नितेश राणेंनी दाखवून दिलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत (grampanchayat election) नितेश राणेंचा पराभव अटळ आहे. नितेश राणेंचे वडील नारायण राणे मुख्यमंत्री होते. त्यांना ही असाच सत्तेचा माज झाला होता, तो माज सिंधुदुर्गच्या जनतेने उतरवला होता अशी टिप्पणी आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी भाजप आमदार नितेश राणेंच्या कणकवलीतील वक्तव्यावर केली.
दरम्यान हिंगोलीत आज, १२ डिसेंबरला काँग्रेससह ठाकरे गटातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर यांच्यासह सेनगाव पंचायत समितीचे माजी सभापती संतोष खोडके यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. पक्षामध्ये काम करताना आपली कुचुंबना होत असल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रवेश केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.