BJP News: सरपंच निवडीत दगा दिल्यास, गावच्या विकासाला निधी देणार नाही; भाजप आमदाराचा ग्रामस्थांना सज्जड दम

राणे साहेबांच्या तालमीत आम्ही सर्वजण तयार झालाे आहेत.
Nitesh Rane, Sindhudurg
Nitesh Rane, Sindhudurgsaam tv
Published On

- विनायक वंजारे

Nitesh Rane : माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही. निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा असा सज्जड दमच आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थितांना कणकवली नजीक एका बैठकीत दिला.

कणकवली नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार नितेश राणे हे आले हाेते. यावेळी एका बैठकीत राणे यांनी मी सत्तेत असलेला आमदार आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी लागणार निधी हा माझ्या हातात आहे.

Nitesh Rane, Sindhudurg
Success Story : नाेकरी मिळाली नाही...जिद्दीने दूसरा मार्ग शाेधला... युवक महिन्याला पन्नास हजार रुपये कमाविताे

परंतु माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा निधी देणार नाही हे लक्षात ठेवा. जिल्हा नियाेजन समिती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे मला विचारल्या शिवाय निधी देणार नाहीत हा विषय तुम्ही स्पष्ट करुन घ्या असेही राणेंनी म्हटलं.

Nitesh Rane, Sindhudurg
Maharashtra News : 'नरेंद्र मोदी म्हणजे रावण, फडणवीसांच्या मदतीने रचलं जातेय माेठं षडयंत्र'

राणे साहेबांच्या (narayan rane) तालमीत आम्ही सर्वजण तयार झालाे आहेत. त्यामुळे आपलं जे काही आहे ते स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या विचाराचा सरपंच निवडून द्यावा असेही आवाहन राणेंनी केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Nitesh Rane, Sindhudurg
Grampanchayat Elections 2022 : ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसेवकास चाेपलं; संघटना आक्रमक
Nitesh Rane, Sindhudurg
Kokan Railway Update : प्रवाशांत संताप, काेकण रेल्वेने ट्विट करुन दिली महत्वपुर्ण माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com