Hit and Run Ghaziabad Accident : हिट अँड रन! भरधाव इलेक्ट्रिक बसने ६ लोकांना चिरडले, रस्त्यावर खळबळ

Hit and Run Ghaziabad Accident update : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हिट अँड रनची घटना घडली. या भागात भरधाव इलेक्ट्रिक बसने ६ लोकांना चिरडलं. या अपघातानंतर ६ प्रवाशांची प्रकृती गंभीर झाली आहे.
Ghaziabad Accident update
Ghaziabad AccidentGoogle
Published On

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात बुधवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मसुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील मसुरी बस स्टँडजवळ इलेक्ट्रॉनिक बसने ६ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघाताच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर बस चालक फरार झाला आहे.

Ghaziabad Accident update
Pune News: पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी थायलंडच्या महिलेचा केला भंडाफोड

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मसुरी स्टँडजवळ प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. दुपारच्या वेळेस अचानक मेट्रो इलेक्ट्रॉनिक बस भरधाव वेगाने आली. त्यानंतर चालकाचं नियंत्रण गमालेल्या बसने ६ जणांना चिरडलं. भीषण अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी धाले आहेत. तर काही प्रवासी थोडक्यात बचावले. प्रवाशांची आरडाओरड केल्यानंतर लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. अपघाताची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी ६ गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Ghaziabad Accident update
Pune History: पुणे शहराचे जुने नाव काय होते? माहितीये का

अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दररोज चालवणारा मेट्रो इलेक्ट्रिक बसचालक हा बस चालवत नव्हता. तर त्याऐवजी बसचा कंडक्टर हा बस चालवत होता. दुसऱ्या बससोबत शर्यत लावण्यात आल्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

Ghaziabad Accident update
Santosh Deshmukh Case: देशमुख कुटुंबीयांची एक मागणी मान्य; उज्ज्वल निकम लढवणार संतोष देशमुख हत्येचा खटला

मुंबईत हिट अँड रन

मुंबईच्या वडाळ्यात काही दिवसांपूर्वी हिट अँड रनची घटना घडली. वडळ्यात घरासमोर महिला आणि तिच्या लहान मुलाला चिरडल्याची घटना घडली. भरधाव कारने दोघांना चिरडलं. कार चालक हा दारुच्या नशेत होता. भीषण अपघातात तीन वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने फरार आरोपीला ताब्यात घेतलं. प्रिया लोंढे असे जखमी महिलेचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com