क्रिकेट खेळत असतानाच एका युवकाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, युवकाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला. ईदच्या दिवशी ही दु:खद घटना घडल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यामध्ये 22 वर्षीय शाकीब दिल्लीमध्ये शिक्षण घेत होता. ईद साजरी करण्यासाठी तो सात दिवसाआधीच आपल्या घरी आला होता. मात्र गावामध्ये क्रिकेट खेळत असताना त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि यामध्ये त्याचे निधन झाले.
पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शाकिब गावातील ईदगाहजवळील मैदानावर आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक कोसळला आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात शुक्रवारी रात्री रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना एका ट्रकमधून कोळशाचा मोठा तुकडा पडल्याने एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला असून दुसरा एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ट्रकमध्ये कोळसा होता आणि मोटारसायकलवरील दोन तरुण गाडी चालवत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रक एनसीएल खारियाहून दुधिछुआ रेल्वे स्टेशनकडे जात होता. स्टेशन प्रभारी कमल नयन दुबे यांनी सांगितले की, मृताची ओळख अमित कुमार (३०) अशी पटली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.