दाऊद इब्राहिमच्या राइट हँडवर ईडीचा मोठा शिकंजा, मुंबई-गुजरातसह 20 ठिकाणी एकाचवेळी छापे

ED Raids On Dawood Ibrahim Associate Salim Dola: दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी संबंधित सलीम डोलावर मोठी कारवाई करण्यात आली असून ईडीने मुंबई, सूरत, अंकलेश्वर आणि राजकोटसह 20 ठिकाणी छापेमारी केली आहे.
ED officials conduct raids at multiple locations linked to alleged drug trafficker Salim Dola in a major money laundering probe.
ED officials conduct raids at multiple locations linked to alleged drug trafficker Salim Dola in a major money laundering probe.saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

कथित ड्रग्स तस्कर सलीम इस्माईल डोला आणि त्याच्या आर्थिक नेटवर्कविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई सुरू केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणात ईडीने मंगळवारी मुंबई, सूरत, अंकलेश्वर आणि राजकोटसह एकूण 20 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ड्रग्ज निर्मिती, अमली पदार्थांची तस्करी, हवाला व्यवहार आणि बेकायदेशीर कमाईच्या पैशांचे वैध गुंतवणुकीत रूपांतर करण्याच्या संशयित व्यवहारांचा तपास या कारवाईत केला जात आहे. सलीम डोला आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांबरोबरच मालमत्ता, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांचीही चौकशी सुरू आहे.

ED officials conduct raids at multiple locations linked to alleged drug trafficker Salim Dola in a major money laundering probe.
Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सलीम डोलाला अटक केली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. चौकशीदरम्यान तपास यंत्रणांना आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करीतून मिळालेल्या पैशांचा वापर परदेशातील मालमत्ता खरेदी, हवाला व्यवहार आणि नेटवर्क विस्तारासाठी करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे ईडी मनी ट्रेलचा मागोवा घेत असून विविध आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहे.

ED officials conduct raids at multiple locations linked to alleged drug trafficker Salim Dola in a major money laundering probe.
#Shorts : Mumbai Water Shortage News | मुंबईवर मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट?

सलीम डोलाचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी जोडले जात असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. तुर्कीमधून भारतात आणल्यानंतर 2023 मधील गाजलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फैसल जावेद शेख याच्या चौकशीतूनही तपासाला नवी दिशा मिळाली आहे. त्याने दिलेल्या माहितीनंतर तपासाचा विस्तार करण्यात आला असून अनेक संशयित आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

ED officials conduct raids at multiple locations linked to alleged drug trafficker Salim Dola in a major money laundering probe.
Pune : हवाई दलाच्या जवानाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू, तिथं नेमकं झालं काय?

दरम्यान, ईडीची छापेमारी आणि तपास प्रक्रिया अद्याप सुरू असून येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com