इबोलाचा उद्रेक; मृतांचा आकडा ३,००० च्या पार, WHO ने दिला मोठा इशारा

Ebola Outbreak In Democratic Republic Of Congo 2026: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव वाढला असून मृतांचा आकडा ३ हजारांच्या पार गेला आहे. WHO ने परिस्थितीबाबत मोठा इशारा दिला आहे.
Ebola Outbreak In DR Congo: Death Toll Crosses 3,000, WHO Warning
Ebola Outbreak In DR Congo: Death Toll Crosses 3,000, WHO Warningsaam tv
Published On

डेमोक्रटिक रिपब्लिकन काँगोमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 3 हजारांच्या पुढे गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा इशारा दिला आहे की, हा उद्रेक इतिहासातील सर्वात घातक इबोला प्रादुर्भावालाही मागे टाकू शकतो. सध्या या विषाणूविरोधात कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलबद्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. इबोलाची काही लक्षणे इतर प्रकारच्या इबोलाच्या तुलनेत सौम्य असू शकतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण रुग्णालयात जाण्यास किंवा आरोग्य अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यास विलंब करत आहेत. यामुळे संसर्गाचा पसरण्याच्या प्रयत्नासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Ebola Outbreak In DR Congo: Death Toll Crosses 3,000, WHO Warning
Dengue Awareness : साधा ताप समजून दुर्लक्ष करू नका; मुलांमध्ये डेंग्यू-मलेरियाची ही लक्षणे ओळखा

झपाट्याने पसरत आहे इबोला

DRC सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. देशाच्या पूर्वेकडील भागात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, मोठ्या संख्येने नागरिकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. त्याचवेळी इबोलाच्या प्रादुर्भावाचा वेगही वाढत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रतिकूल परिस्थितीचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामावरही परिणाम होत आहे. नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असल्याने आजाराच्या प्रसारावर लक्ष ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

Ebola Outbreak In DR Congo: Death Toll Crosses 3,000, WHO Warning
Social media addiction: रोज 150 मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर स्क्रोल करताय? सावधान! डिप्रेशनचा धोका वाढण्याची शक्यता

२.३ कोटी लोकांची आरोग्य तपासणी

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने (IOM) सांगितले की, काँगो आणि शेजारील देशांमध्ये आतापर्यंत जवळपास २.३ कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, संभाव्य रुग्णांची ओळख पटवणे आणि सीमापार संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com