Earthquake In Philippines : फिलिपिन्स भूकंपाच्या धक्क्याने हादरलं; ६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

फिलिपिन्सच्या बाबगला ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची घटना घडली आहे
Earthquake
Earthquake saam tv
Published On

Philippines News : फिलिपिन्समधून मोठी बातमी हाती आली आहे. फिलिपिन्सच्या बाबगला ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची घटना घडली आहे. भूकंपानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, फिलिपिन्समधील बाबग शहर भूकंपाने (Earthquake) हादरलं आहे. बाबगला ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने बाबग शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भूकंपाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

भूकंप १ फेब्रुवारी रोजी फिलिपिन्सच्या (Philippines) वेळेनुसार ६.४४ वाजण्याच्या सुमारस भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल मोजली गेली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराच्या बाहेर पडून सैरावैरा पळू लागले. या भूकंपात अद्याप किती नुकसान झालं, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Earthquake
Nirmla Sitharaman: सुख, समृद्धी अन् भरभराट; अर्थमंत्र्यांच्या साडीबद्दल 'या' खास गोष्टी जाणून घ्याच...

पाकिस्तानातही झाला होता भूकंप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील (Pakistan) इस्लामाबाद भूकंपाच्या धक्क्याने हादरलं होतं. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये रविवारी दुपारी १:२४ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजली गेली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची पुष्टी केली होती.

गेल्या वर्षीच्या जून महिन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) 6.1 तीव्रतेचे भूकंपाचे (Earthquake) झटके जाणवले होते. त्यानंतर पाकिस्तानात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के इस्लामाबादसहित अनेक शहरात जाणवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com