Delhi Earthquake: दिल्ली-NCR सह अख्खा उत्तर भारत भूकंपानं थरथरला; भूकंपाचा केंद्रबिंदू मात्र दुसऱ्या देशात!

Delhi-NCR Earthquake: दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरसह आज संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे हादरे बसले आहेत.
Delhi-NCR Earthquake
Delhi-NCR EarthquakeSaam Tv
Published On

Delhi-NCR Earthquake:

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरसह आज संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे हादरे बसले आहेत. अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानात आज दुपारी 2.50 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती.

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात भूकंप झाला होता, ज्याचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले. दिल्लीशिवाय हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. असं असलं तरी सध्या देशात कुठेही या भूकंपाच्या धक्क्यामुळे नुकसान झाल्याचं वृत्त नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi-NCR Earthquake
MLA Disqualification Result: अजिबात धाकधूक नाही, मात्र 'त्या' भेटीनं संशय वाढला; NCP च्या सुनावणीवर जयंत पाटील काय म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नोएडा, गुरुग्राम आणि फरीदाबादच्या सोसायट्यांमधून लोक लगेचच बाहेर आले. कार्यालयांमध्येही जेवणाची वेळ होती आणि धक्के जाणवताच लोकांनी बाहेर धाव घेतली. अनेक लोकांनी सोशल मीडियावर भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. तर काहींनी आपला अनुभव शेअर केला आहे. यातच एका व्हिडिओत भूकंपाच्या हदराने घरातील सिलिंग फॅन हलताना दिसत आहे. (Latest Marathi News)

Delhi-NCR Earthquake
Samsung च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर; 32MP सेल्फी कॅमेरा असलेला या फोनवर मिळत आहे 5500 रुपयांची सूट

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दिल्ली भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. दिल्लीतील यमुनेच्या आसपासच्या क्षेत्राबाबत शास्त्रज्ञांनी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com