भूकंपाच्या धक्क्याने जमीन थरथरली; गूढ आवाजाने लोकांची धावाधाव, एकाचा मृत्यू

Earthquake News Update : चीन आणि जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्याने जमीन थरथरली आहे. तर गूढ आवाजाने लोकांची एकच धावाधाव झाली.
Earthquake News
Earthquake NewsSaam tv
Published On
Summary

चीन आणि जपानमध्ये भूकंपाचे धक्के

भूकंपामुळे एकाचा मृत्यू

शहरातील उंच भागातही भूकंपाचे धक्के

चीन आणि जपानमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. चीनच्या उत्तर-पश्चिम भागात ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोल होता. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहे. शहरातील काही उंच भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake News
भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

भूकंप झाल्यानंतर चिनी प्रशासनाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असलेल्या कोळसा खाणींमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना शोधण्याचं काम सुरू केलं आहे. तसेच अधिकारी भूकंपामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहे.

इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर देखील ६.७ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाच्या धक्क्यानंतर अनेक ठिकाणी नुकसान झालं. शहरातील अनेक लोक घरातून रस्त्यावर पळत आले. सुलावेसी बेटाच्या पालू शहरावर ८ वर्षाआधी झालेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे आर्थिक नुकसान झालं होतं. पालू शहरात जवळपास ४ लाख लोक राहतात. भूकंप झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांना रुग्णांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

Earthquake News
जमीन थरथरली, लोक घाबरून घराबाहेर पळाले; शहराला बसले भूकंपाचे सौम्य धक्के

हिंगोलीतही भूकंपाचे धक्के

हिंगोलीत सोमवारी पांगरा शिंदे गावासह परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात दोन महिन्यात ४ वेळा भूकंप झाल्याची घटना आहे. यापूर्वी देखील भूकंपाचा मोठा हादरा बसला होता. हिंगोलीतील पांगरा, बोल्डा,बोल्डावाडी यागावासह परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आलं. हिंगोलीत झालेल्या भूकंपामुळे कोणत्याही नुकसान झाल्याची माहिती हाती आलेली नाही. परंतु सोमवारी रात्री झालेल्या भूकंपामुळे हिंगोलीकरांमध्ये एकच भीती पसरली.

Earthquake News
भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com